Sameer Wankhede Controversy sameer wankhede bribery case may shahrukh khan and aryan khan record statement  Esakal
मनोरंजन

Sameer Wankhede Bribery Case: 25 कोटी वसुली प्रकरणात शाहरुख अन् आर्यनचा जबाब नोंदणार? नवा ट्विस्ट!

Vaishali Patil

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं समीर वानखेडे प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहे. त्यातच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची चौकशीही सुरु होती.

बेहिशोबी मालमत्ता आणि अन्य भ्रष्टाचार प्रकरणाबरोबरच आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप त्याच्यावर असून सीबीआयने समीर वानखेडेंची चौकशी सुरु आहे. त्यातच आता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांचा देखील पुन्हा या प्रकरणात सहभाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या प्रकरणातून क्लीन चिट मिळाल्यानंतरही आर्यन खान अन् अभिनेता शाहरुख खान यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना बोलवण्यात येणार असल्याच सांगण्यात येत आहे.

लवकरच या प्रकरणात त्याचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याची शक्यता असल्याची माहीती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबी अधिकाऱ्यानी दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती देतांना अधिकारी म्हणाले की ते लवकरच याप्रकरणी शाहरुख खान आणि आर्यन खान यांचे जबाब नोंदवू. या प्रकणारच्या तळाशी जाण्यासाठी त्याचे जबाब नोंदवणे आवश्यक आहे.

एजन्सीने मे मध्ये वानखेडेंची अंशत: तपासणी केली आहे मात्र या प्रकरणाच्या आणखी चौकशीसाठी न्यायालयाच्या परवानगीची वाट ते पाहत असल्याच त्यांनी सांगितलं.

एजन्सीने मे महिन्यात समीर वानखेडेची चौकशी केली आहे, परंतु त्याच्याशी औपचारिकपणे चौकशी करण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची प्रतीक्षा करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वानखेडे यांना २३ जूनपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं आहे.

गेल्याकाही दिवसांपासून या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. एनसीबीच्या समीर वानखेडे व्यतिरिक्त बऱ्याच लोकांचे जबाब याप्रकरणी नोंदवले आहे.

त्यातच आता समीर वानखेडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खरचं याप्रकरणी खंडणी मागितली होती की नाही? या प्रकरणाबद्दल शाहरुख आणि आर्यन यांचे काय जबाब असतील यावर या प्रकरणाचं भवितव्य अवलंबून असेल असं बोलल जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT