Sameer Wankhede death threats from bangladesh who arrested Shah Rukh Khan's son Aryan Khan SAKAL
मनोरंजन

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांना आता थेट बांग्लादेशमधून जीवे मारण्याची धमकी

समीर वानखेडेंना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे

Devendra Jadhav

Sameer Wankhede News: गेल्या अनेक महिन्यांपासून समीर वानखेडे चर्चेत आहेत. समीर वानखेडे यांनी आर्यन खानला कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात अटक केली.

पुढे समीर वानखेडेंनी आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची लाच घेतली असा आरोप त्यांच्यावर प्रकरणात आला. पुढे या प्रकरणातून कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

या सर्व प्रकरणानंतर समीर वानखेडेंना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले असल्याने खळबळ उडाली आहे.

(Sameer Wankhede death threats from bangladesh who arrested Shah Rukh Khan's son Aryan Khan)

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय महसूल सेवा अधिकारी आणि एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. सध्या चेन्नईमध्ये कार्यरत असलेल्या वानखेडे यांना या आठवड्याच्या सुरुवातीला बांग्लादेशातील एका धर्मांधाकडून फोनवर धमक्या आल्या होत्या.

अहवालात पुढे म्हटले आहे की, बांग्लादेशातील धर्मांधाने मुंबई पोलिस आयुक्तांना आणि मुंबईतील वानखेंडेंच्या कायमच्या निवासस्थानाजवळील स्थानिक पोलिस स्टेशनला ईमेल पाठवून धमकीबद्दल माहिती दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

समीर वानखेडे NCB च्या मुंबई झोनचे प्रमुख होते शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा समावेश असलेल्या कथित ड्रग जप्तीच्या प्रकरणासह त्यांनी काही हाय-प्रोफाइल प्रकरणे हाताळली. या प्रकरणात अटक करण्यात शाहरुख खान आणि इतरांच्या कुटुंबीयांकडून २५ कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता. परंतु कोणताही पुरावा सापडला नसत्याने एनसीबीने त्यांच्याविरुद्धचा खटला मागे घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT