Sameer Wankhede scores a win in the 25 crore bribery case : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. त्यांनी शाहरुखकडून २५ कोटींची लाच घेतल्याचा आऱोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.
यासगळ्या प्रकरणात कॅटनं एक महत्वाचा निकाल दिला आहे. आर्यन खान प्रकरणात लाच घेतल्याचा जो आऱोप वानखेडे यांच्यावर करण्यात आला होता, त्यातून वानखेडे यांची सुटका करण्यात आली आहे. त्यात ते निर्दोष असल्याचे सांगण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिले आहे.
Also Read - Travel Insurance: परदेशात शिक्षण घेताना प्रवास विमा का महत्त्वाचा आहे?
यासंबंधी सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात कॅटनं एक त्यांच्या आदेशामध्ये असे म्हटले आहे की, एनसीबीचे संचालक ज्ञानेश्वर सिंग हे काही वानखेडे यांच्यासाठी जी चौकशी समिती नेमली होती त्या समितीचा भाग नव्हते. कारण वानखेडे यांनी जी कारवाई केली आणि त्यातून त्यांनी जो तपास केला त्याचे सगळी माहिती सिंग यांना होती असे म्हणता येणार नाही.
वानखेडे यांनी कॉर्डेलिया नावाच्या क्रुझवर जी कारवाई केली होती त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आणि ती कारवाई करण्यात वानखेडे अग्रस्थानी होती. त्यानंतर वानखेडे यांना वेगवेगळ्या प्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. मात्र त्यांनी कायदेशीर उत्तर देत आता शाहरुखला देखील जशास तसे उत्तर दिले आहे.
या प्रकरणात कारवाई करताना वानखेडे यांनी शाहरुखकडून २५ कोटींची लाच मागितली होती. असा आरोप वानखेडे यांच्यावर करण्यात आला होता. त्याची चौकशीही सुरु होती. सीबीआयनं वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यातून त्यांना आता दिलासा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.