Sana Khan pregnant at 34 with her first child with Anas Saiyad sakal
मनोरंजन

Sana Khan: इस्लाम धर्मासाठी बॉलिवूड सोडणारी सना खान लवकरच होणार आई.. जाहीर केली 'ती' तारीख..

नुकत्याच एका मुलाखतीत सना खानने ती गरोदर असल्याचे जाहीर केले.

नीलेश अडसूळ

Sana Khan: अभिनेत्री सना खान हे बॉलीवुडमध्ये नसूनही चर्चेत असलेलं नाव. तिने काही दोन वर्षांपूर्वी बॉलिवूडला कायमचा निरोप दिला आणि सांसारकडे वळली. पण अजूनही तीचं चाहतावर्ग तितकाच असल्याने ते तिच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात.

नुकत्याच एका मुलाखतीत तिने ती लवकरच आई होणार असल्याने सांगितले आणि सना खान गरोदर असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाली. सध्या सोशल मीडियावर तिच्याच प्रेगंन्सीची चर्चा आहे.

(Sana Khan pregnant at 34 with her first child with Anas Saiyad)

सनाने 2020 मध्ये इस्लाम धर्मासाठी अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्याचे थांबवले आणि इस्लाम धर्मातील धार्मिक कार्य करणाऱ्या अनस सैय्यदबरोबर निकाह केला. सध्या सना पती सोबत आपल्या संसारात रममान आहे.

अभिनयक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियाद्वारे ती कायमच चाहत्यांशी संवाद साधत असते. आता सनाने सगळ्यांनाच आनंदाची बातमी दिली आहे. सना व अनसच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

सनाने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की, ''सध्या मी एका गोष्टीसाठी खूपच उत्सुक आहे. ते म्हणजे मी माझ्या बाळाची वाट पाहत आहे. लवकरच माझं बाळ माझ्या हातात असावं असं मला वाटतं.'

गेल्या काही दिवसांपासून सना गरोदर असल्याची चर्चा होती. मात्र सनाने याबाबत कोणतीही स्पष्टता दिली नव्हती. मात्र आता तिने स्वतःच ती आई होणार असल्याची स्पष्टता दिली आहे. जून अखेरी पर्यंत ती आई होऊ शकते असं प्रसूती बाबतही ती म्हणाली.

सना खान ‘बिग बॉस ९’मध्येही सहभागी झाली होती. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. सनाने मोठ्या पडद्यावरही आपलं नशीब आजमावलं आहे. तिच्या अफेअरची देखील बरीच चर्चा होती पण तिनं २०२०मध्ये अनस सोबत लग्नं केले आणि बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेला रामराम केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

SCROLL FOR NEXT