Sangeet Devbabhali marathi drama announced last few shows written and directed by prajakt deshmukh bhadrakali production
Sangeet Devbabhali marathi drama announced last few shows written and directed by prajakt deshmukh bhadrakali production sakal
मनोरंजन

Sangeet Devbabhali: रंभूमीवरील विक्रमी नाटक 'संगीत देवबाभळी' घेणार प्रेक्षकांचा निरोप..

नीलेश अडसूळ

sangeet devbabhali : गेली चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या प्राजक्त देशमुख लिखित दिग्दर्शित 'संगीत देवबाभळी' या भद्रकाली प्रोडक्शनच्या नाटकाने अनेक विक्रम रचले. अगदी गल्ली पाहून ते दिल्ली पर्यंत, शाळा, कॉलेज, ते अगदी साहित्य अकादमी पर्यंत या नाटकाने मजल मारली. केवळ मराठीच नाही तर बहुभाषिक नाट्य वेड्या रसिकांनाही या नाटकाने भावविवश केले. अशा 'संगीत देवबाभळी' या नाटकाबाबत नुकतीच एक महत्वाची घोषणा भद्रकाली प्रोडक्शनने केली आहे. लवकरच हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार असून आता शेवटचे काही प्रयोग सादर होणार आहेत.

(Sangeet Devbabhali marathi drama announced last few shows written and directed by prajakt deshmukh bhadrakali production)

व्यावसायिक रंगभूमीवर 'संगीत देवबाभळी' या नाटकाने अनेक विक्रम केले. aajvआजवर ४४ पुरस्कार प्राप्त या नाटकाला 'साहित्य अकादमी' युवा पुरस्कारही प्राप्त झाला. विशेष म्हणजे हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या 'बीए' अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आले. विजया मेहता, स्व. जयंत पवार , डॅा. राजीव नाईक, सतीश आळेकर, नसिरुद्दीन शाह, परेश रावल, दिलीप प्रभावळकरअशा अनेक दिग्गजांनी या नाटकाला गौरवले आहे. अशा ही मराठी रंगभूमीवरील एक मैलाचा दगड ठरलेली कलाकृती निरोपाकडे निघाली आहे.

नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी, लेखक प्राजक्त देशमुख यांनी एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की, ''संगीत 'देवबाभळी' शेवटचे काही प्रयोग.... २२ डिसेंबर २०१७ म्हणजे तब्बल ५ वर्षापुर्वी ‘संगीत देवबाभळी’ हा प्रवास तुमच्या साक्षीने सुरु केला. नवं संगीत नाटक? फक्त दोन मुली? एक नवीन दुसरी अनुभवी, नवा लेखक दिग्दर्शक? नवा संगीत दिग्दर्शक? नवा प्रकाशयोजनाकार? अशा अनेक प्रश्नांवर स्वार होऊन ‘भद्रकाली’ च्या ह्या नाटकाने ५ वर्षात महाराष्ट्र शासन, झी नाट्य गौरव, म. टा. सन्मान असे आणि याशिवाय अनेक मानाचे पुरस्कार पटकावले. ह्यावर कळस होता तो 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या संहितेला मिळालेला युवा साहित्य अकादमी पुरस्कार. सगळा स्वप्नवत प्रवास.''

''एकूण मिळालेल्या सर्वाधिक ४४ पुरस्कारांपेक्षाही सगळ्यात मोठा पुरस्कार होता तो…रसिक मायबापहो तुमचं प्रेम. कुणी भरभरून लिहायचं, कुणी मिठ्या मारायचं, कुणी पाया पडायचं, कुणी २२-२२ वेळा नाटक पहायचं ! हे सगळं किती अविश्वसनीय आहे !

''‘भद्रकाली’ने नेहमीच नवता आणि मनोरंजनाचा ध्यास घेतला. स्व. मच्छिंद्र कांबळी ह्यांचा वारसा पुढे नेताना त्याला आणखी वैभवशाली करण्याकडेच आमचा कल होता, आहे आणि अर्थात पुढे राहिल. पण थांबायचं ठिकाण माहित नसतांना सुरु असलेल्या प्रवासाला ‘भटकणं’ म्हणतात. आणि वारी एकदा मुक्कामाला पोचली की परतवारी करणं भागच असतं.''

''तर रसिक मायबापहो, परतवारी सुरु होतेय. येत्या काही दिवसात आम्ही पुन्हा त्याच तन्मयतेने तुमच्या पुढं येतोय. पण आता हे निरोपाचे प्रयोग असतील. भेटूया तुमच्या जवळच्या नाट्यगृहात. बरं नाट्यगृह जवळ नसलं तरी आता मात्र भेटायचं चुकवू नका कारण…. संगीत देवबाभळी…. निरोपाचे काही प्रयोग.'' असे या पोस्ट मध्ये म्हंटले आहे. तेव्हा हे नाटक प्रत्येकाने आवर्जून पाहाच..

नाटकात काय आहे?

'भंडाऱ्याच्या डोंगरावर संत तुकोबांना भाकरी द्यायला गेलेली नि काटा रूतून बेशुद्ध झालेली आवली आणि तिला लखुबाई बनून घरी घेऊन येणारी साक्षात रखुमाई यांच्यातील अनोख्या संवादातून लौकिक अलौकिक नात्याची वीण प्राजक्त देशमुख यांनी या नाटकात रेखटली आहे. देवत्व लाभलेल्या राखुमाईला आवलीच्या माध्यमातून आलेले लौकिक भान आणि संसारी आवलीच्या साध्या प्रश्नांनी गाठलेली अलौकिक पातळी या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. या नाटकात अभिनेत्री मानसी जोशी हिने राखुमाईची तर अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने आवलीची भूमिका साकारली आहे. प्रसाद कांबळी यांच्या 'भद्रकाली प्रॉडक्शन'ने हे नाटक रंगभूमीवर आणले आहे. हे नाटक पाहताना आपल्याला काही क्षणासाठी ही आपलीच कथा आहे की काय असे वाटते. नाटकाचं संगीत आपल्याला मंत्रमुग्ध करतं. तर सहज आणि सोपे संवाद आपल्या काळजाचा ठाव घेतात. आवली आणि राखुमाई आपल्या मैत्रिणी वाटतात, तर 'संगीत देवबाभळी' हे नाटक कायम स्मरणात ठेवावंसं वाटतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dikshabhumi Case : दीक्षाभूमी परिसरातील घटनेनंतर नागपूर पोलिसांकडून मोठी कारवाई; ...आरोपींच्या नावांची गुप्तता

Hathras stampede: चेंगराचेंगरीनंतर फरार झालेला भोले बाबा अखेर सापडला

Ladki Bahin Yojna : लाडकी बहिण याेजनेच्या कागदपत्रांसाठी पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल

Hathras stampede: सातारा ते जोधपूर... देशातील अशा घटना जिथे चेंगराचेंगरीमुळे गमावले शेकडो भाविकांनी प्राण

Thane Ulhasnagar Crime: वाढदिवशी पार्टीमध्ये दारू कमी पडली! 'बर्थ डे बॉय'ला 3 मित्रांनी चौथ्या मजल्यावरून फेकलं

SCROLL FOR NEXT