Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Teaser on social media viral Sakal
मनोरंजन

‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’चा टीझर व्हायरल

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा प्रवास रूपेरी पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे. याची घोषणा काही महिन्यांपूर्वीच झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा प्रवास रूपेरी पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे. याची घोषणा काही महिन्यांपूर्वीच झाली होती. आता या सिनेमाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

तसंच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. अभिनेता रोहन पाटील हे मनोज जरांगे यांच्या भूमिकेत आहेत. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री सुरभी हांडे, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

दरम्यान, या सिनेमाचा टीझर समोर आला आहे. सिनेमात मराठा आंदोलनाची झलक पाहायला मिळतेय. जाहीर सभा, बाईक रॅली, ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा हे सगळं पाहायला मिळत आहे. तर मनोज जरांगे यांच्या म्हणजेच रोहन पाटील यांच्या तोंडी असलेले संवादही लक्ष वेधून घेत आहेत. ‘मी बायकोला सांगतानाच सांगितलंय आलो तर तुझा..., गेलो तर समाजाचा’ हा डायलॉग सध्या लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. येत्या २६ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीनही पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी; भाजप-धजद युतीला धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचे दोन पुत्र पराभूत

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएलचा मेगा लिलाव आज! थोड्याच वेळात सौदी अरेबियात खेळाडूंवर बोली लागणार

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली, पण.... अब्दुल सत्तार यांचा खोचक टोला

IND vs AUS 1st Test : विराट कोहलीचे १६ महिन्यांनंतर कसोटीत शतक! भारताचे यजमानांसमोर ५३४ धावांचे तगडे लक्ष्य

Oath Ceremony: महायुतीच्या बैठकांचा धडाका, पुढील रणनिती आखण्यावर चर्चा, शपथविधीबाबत मोठी माहिती समोर!

SCROLL FOR NEXT