sangli shekhar bapu rankhambe won national awards 2023 marathi non feature film for rekha SAKAL
मनोरंजन

National Awards 2023: सांगलीच्या पठ्ठ्याने राष्ट्रीय पुरस्कारावर कोरले नाव ! सामाजिक विषयावर बनवलेल्या माहितीपटाला स्पेशल ज्यूरी अवॉर्ड

सांगलीच्या पठ्ठ्याने राष्ट्रीय पुरस्कारावर स्वतःचं नाव कोरलंय

Devendra Jadhav

६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झालीय. या सोहळ्यात शेखर बापू रणखांबे या सांगलीच्या दिग्दर्शकाने राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरलंय. शेखर बापू रणखांबे यांच्या रेखा या सिनेमाला सामाजिक विषयावरील माहितीपट ज्युरी अॅवॉर्ड मिळाला आहे. (sangli shekhar bapu rankhambe won national awards 2023 marathi non feature film for rekha)

शेखर रणखांबे हे तासगाव तालुक्यातील पेड सारख्या ग्रामीण भागातील आहेत. आता पर्यंत बनवलेल्या सर्व लघुपट हे सामाजिक आशय असलेले असे आहेत. रेखा या लघुपटातील नायिका माया पवार ही पारधी समाजातील आणि अशिक्षित अशी युवती आहे.

या लघुपटातील अन्य कलाकार व तंत्रज्ञ सांगली जिल्ह्यातील स्थानिक कलाकार आहेत त्यांना घेऊन शेखर रणखांबे यांनी रेखा या लघुपटाची निर्मिती केली आणि हा लघुपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पडद्यावर पोहोचला

दिग्दर्शक शेखर यांचं संशोधन

दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी रेखाच्या माध्यमातुन मोठा आणि विषय मांडला आहे. आपण अनेकदा रस्त्याशेजारी राहणाऱ्या महिलांकडे दुर्लक्ष करतो. रस्त्यावर राहणाऱ्या महिला सुद्धा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात.

या महिलांच्या आयुष्यातील अडचणी मांडतानाच रेखा हा माहितीपट महिलांच्या मासिक पाळी आरोग्याच्या  वाईट स्थितीकडेही लक्ष वेधतो. “या विषयावर संशोधन करत असताना या महिला किती अस्वच्छ असतात आणि त्या दिवसेंदिवस अंघोळ करत नाहीत." अशी प्रतिक्रिया रणखांबे यांनी दिलीय.

काय आहे माहितीपटाचा विषय

रेखा या माहितीपटात नायिका रेखा रस्त्याच्या कडेला राहते. ती त्वचेच्या बुरशीजन्य संसर्गाने ती ग्रस्त असते. डॉक्टर तिला आंघोळ करून औषध लावायला सांगतात. पण तिचा नवरा तिला अडवतो आणि तिच्याशी दुर्व्यवहार करतो. रेखा आंघोळ करण्यासाठी  प्रयत्न करते पण जेव्हा तिच्या समाजातील महिला तिला आंघोळ न करण्याचे कारण सांगतात  तेव्हा तिला धक्काच बसतो. तिची द्विधा मनस्थिती होते.  ती आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेते जेणेकरून तिला संसर्गावर उपचार करण्यासाठी आंघोळ करता येईल. स्वच्छ राहण्यासाठी तिने केलेल्या संघर्षाचे  कहाणी या फिल्ममध्ये आहे.

मेलबर्न पुरस्कार सोहळ्यात झाली रेखाची निवड

काहीच दिवसांपुर्वी रेखा सिनेमाची मेलबर्न फेस्टिव्हलमध्ये निवड झाली. त्यावेळी दिग्दर्शक रणखांबेंनी पोस्ट लिहीली होती, "खुप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट "रेखा" या आमच्या रवि जाधव फिल्म्स प्रस्तुत आणि रवि जाधव, मेघना जाधव निर्मित लघुपटाची निवड प्रतिष्ठीत इंडियन फिल्म फेस्टीवल ऑफ मेलबर्नमध्ये निवड झाली आहे. रेखाचा इफ्फी पासून सुरू झालेला हा प्रवास बर्लिन, स्टुअटगार्ड, आणि आता मेलबर्न पर्यंत पोहोचलाय. यापुढेही रेखा चा प्रवास असाच सुरू रहावा. हा प्रवास होतोय ही खूप आनंद आणि प्रेरणा देणारी गोष्ट आहे.
सगळ्या टीमचं आणि आमचे निर्माते रवि जाधव सर आणि मेघना जाधव मॅम यांचं खूप अभिनंदन."

रेखा या मराठी माहितीपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरल्यामुळे सांगली आणि महाराष्ट्राचं नाव मोठं झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT