Sanjay Dutt: बॉलीवूड अभिनेता संजय दत्त लवकरच कॉमेडी कोर्टरुम शो 'केस तो बनता है' या कार्यक्रमात दिसणार आहे. रितेश देशमुख आणि कुषा कपिला मिळून संजय दत्तची मस्करी करत काही भन्नाट आरोप करताना दिसणार आहेत. काही महिने आधी रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट व्हायरल झालं होतं. आणि त्यावरनं बराच वाद रंगला होता. बस्स...आता याचीच थोडी खिल्ली उडवत संजय दत्तनं आपलं मत सर्वांसमोर ठेवलं आहे. वरुण शर्मानं संजय दत्तला विचारलं,'जर १९९३ मध्ये आलेल्या 'खलनायक' सिनेमाचा रीमेक बनला तर तुला कोणत्या अभिनेत्याला त्यात पहायला आवडणार नाही?'.(Sanjay Dutt jokes about why he doesn't want Ranveer SIngh to play his role from 'Khalnayak')
वरुण शर्मानं तीन नावं संजय दत्तला सांगितली. त्यात रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि विकी कौशल ही नावं होती. संजय दत्त म्हणाला,''मला वाटतं यात रणवीर सिंगनं काम करू नये,कारण मी ऐकलंय आजकाल तो कपडे घालत नाही''. रणवीर सिंगच्या न्यूड फोटोवरनं जो वाद रंगला होता,तो त्यानं पेपर मॅगझीनसाठी केलेल्या फोटोशूटवरनं. यामुळे अभिनेत्यावर एका एनजीओनं केस दाखल केली होती. एनजीओचं म्हणणं होतं की, रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटमुळे महिलांचा अपमान झालेला आहे. पण त्यावेळी बॉलीवूडमधून अनेकांनी रणबीरला पाठिंबा दर्शवला होता.
त्यानंतर टी.व्ही अभिनेता नकुल मेहतानं रणवीर सिंगच्या चेहऱ्यावर स्वतःचा चेहरा मॉर्फ केला होता. ज्यानंतर तो फोटो वेगानं व्हायरल झाला होता. याव्यतिरिक्त विद्या बालनने देखील एका मुलाखतीत म्हटलं होतं की, 'काय त्रास होतोय त्यानं न्यूड फोटोशूट केलं तर? पहिल्यांदा कुणीतरी पुरुषानं हे शूट केलं आहे. आमच्या डोळ्यांनाही थोडा आनंद मिळू देत'.
संजय दत्तच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तो लवकरच ध्रुवा सारजाचा कन्नड सिनेमा 'केडी-द डेव्हिल' मध्ये दिसणार आहे. याआधी संजय 'केजीएफ चॅप्टर २' मध्ये दिसला होता. त्यानंतर रणबीरसोबत 'शमशेरा' सिनेमातही त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्याआधी संजय दत्त 'तुलसीदास ज्युनिअर' आणि सम्राट पृथ्वीराजचा देखील भाग होता. संजय दत्तनं नुकतेच एका कार्यक्रमात, ''आपण आता साऊथ सिनेमांमध्ये काम करणार,बॉलीवूडनं टॉलीवूडकडनं शिकावं काहीतरी'', असं मोठं वक्तव्य केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.