Santosh Juvekar: दिवाळी निमित्तानं अनेक कलाकारांनी आपले कलरफुल फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले अन् सोबत आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. या पोस्टमध्ये सध्या चर्चेत आलीय ती संतोष जुवेकरची पोस्ट. त्यानं चाहत्यांना शुभेच्छा तर दिवाळीच्या दिल्या आहेत पण कॅप्शनमध्ये जे लिहिलंय ते एकदम हटके आहे. 'उपकार नको आणि भोचकपणा तर अजिबातच नको..' म्हणत संतोष जुवेकरनं दिवाळीच्या दिलेल्या शुभेच्छा सध्या चर्चेत आहेत. चला जाणून घेऊया संतोष नेमकं असं का म्हणालाय किंवा त्याला नेमकं काय म्हणायचंय?(Santosh Juvekar Diwali wish post viral, 36 goon Marathi movie, Marathi Actor)
संतोष जुवेकर सध्या त्याच्या '3६ गुण' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात त्याच्यासोबत पुर्वा पवार आहे. समित कक्कड दिग्दर्शित हा सिनेमा लग्न,प्रेम, लीव्ह इन रिलेशनशीपवर आधारित आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा त्याच्यातील बोल्ड सीन्सची जोरदार चर्चा रंगली. सिनेमा बोल्ड असला तरी लग्नासारख्या विषयावर मनाला भिडणारा, थेट बोलणारा खरा सिनेमा असल्याचं सिनेमातील कलाकार सांगत आहेत.
संतोष अनेक दिवसांनी मराठी सिनेमात दिसत आहे. आता संतोष हिंदी सिनेमातही व्यस्त असतो. नुकताच तो आपल्याला आलिया भट्टसोबत 'डार्लिंग' सिनेमात दिसला होता. ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत संतोषनं म्हटलं होतं की त्याला मराठीत काम देत नाहीत म्हणून तो आपल्याला दिसत नाही. तसं पाहिलं तर संतोष अनेकदा सोशल मीडियावरही खूप स्पष्टपणे व्यक्त होतो. त्यामुळे आता दिवाळीनिमित्तानं केलेल्या पोस्टमध्ये संतोष असं का म्हणाला हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच असणार, अर्थात पूर्ण पोस्ट वाचल्यावर याचा अंदाज येईलच आपल्याला.
संतोष जुवेकरनं दिवाळी निमित्तानं त्याच्या ३६ गुण सिनेमाचं पोस्टर पोस्ट करत शुभेच्छा देताना लिहिलं आहे,
उपकार नको आणि भोचकपणा अजिबातच नको.
जर आवडलं तरच शाब्बास म्हणा आणि नाही आवडलं तर.........
मी पुन्हा प्रयत्न करेन आणि करत राहीन,
तुम्हाला मी आवडण्यासाठी
तुम्ही फक्त माझ्या सोबत रहा.
खूप दिवस एकट्याने वाट पाहिली, आता तुम्ही साथ दिलीत तर सगळंच सार्थकी लागेल.
देणार ना साथ?
चला धमाका करूयात.
शुभ दीपावली तुम्हाला.
संतोषच्या या पोस्टमध्ये खरंतर खूप अर्थ दडलेले आहेत. तो एकप्रकारे मराठी इंडस्ट्रीतील टीकाकारांना सुनावताना देखील दिसत आहे आणि बरोबरीनं आपल्या चाहत्यांनाही दिवाळीच्या हटके शुभेच्छा देत ३६ गुण सिनेमा पाहण्याचं आवाहन करताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.