मनोरंजन

'तोकडे कपडे न घातल्यामुळेच बॉलिवूडमध्ये संधी नाही'; सपना चौधरी

अशा परिस्थितीत मी कसं काय तग धरू शकेन?

शर्वरी जोशी

हरियाणवी डान्सर आणि गायिका सपना चौधरी कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे चर्चेत असते. एका लहानशा गावातून आलेल्या सपनाने कलाविश्वात १५ वर्ष पूर्ण केले आहेत. या १५ वर्षांच्या कारकिर्दीत तिने बरीच लोकप्रियता मिळवली. मात्र, अद्यापही हिंदी कलाविश्वात यशस्वीरित्या पदार्पण केलेलं नाही. त्यामुळे अनेकदा सपना बॉलिवूडमध्ये पदार्पण कधी करणार असा प्रश्न चाहत्यांना पडतो. मात्र, 'अंगप्रदर्शन करणारे कपडे घालत नसल्यामुळेच मला हिंदी कलाविश्वात काम मिळत नाही', असं सपनाने अलिकडेच झालेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. (sapna chaudhary reveals her struggle in hindi film industry)

"याच वर्षी मला कलाविश्वात १५ वर्ष पूर्ण झाले आहेत. मला हिंदी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम करायची इच्छा आहे. परंतु, मी प्रादेशिक कलाविश्वातून आल्यामुळे कदाचित माझं टॅलेंज दाखवण्याची संधी मला मिळत नाही", असं सपना म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मला अंगप्रदर्शन करणारे (तोकडे) कपडे परिधान करायला आवडत नाही. मी उत्तमरित्या इंग्लिश बोलू शकत नाही. इथे माझा कोणीच गॉडफादर नाहीये. त्यामुळेच मी अजूनही बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकले नाही. अजूनही हिंदी कलाविश्वात संधी मिळावी यासाठी मी स्ट्रगल करत आहे. ज्यावेळी तुमच्याजवळ एखाद्याचं काम असतं त्याचवेळी ते तुमच्याशी बोलायला येतात. या कलाविश्वात असे अनेक लोक आहेत जे सतत तुम्हाला जज करतात. अनेकदा माझ्याकडे पाहून डिझायनर्सने मला डिझायनर कपडे देण्यासाठीही नकार दिला आहे. मला माहित नाही मी अशा परिस्थितीत कसं काय तग धरू शकेन."

दरम्यान, सपना चौधरीने तिच्या करिअरची सुरुवात हरियाणाच्या ऑर्केस्ट्रापासून केली. त्यानंतर तिने स्टेज डान्स करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे याच डान्सच्या जोरावर ती आज लोकप्रिय झाली असून तिने ‘बिग बॉस ११’ मध्ये सहभागही घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT