Manushi Chhillar, sara ali khan, cannes 2023, cannes 2023 film festival, esha gupta, cannes 2023 red carpet SAKAL
मनोरंजन

Cannes 2023: सारा अली खान ते ऊर्वषी रौतेला.. या अभिनेत्रींनी गाजवला कान्सचा रेड कार्पेट

पांढर्‍या पोशाखात मानुषी सिंड्रेलापेक्षा कमी दिसत नव्हती

Devendra Jadhav

Sara Ali Khan - Manushi Chhillar at Cannes 2023: 76 वा कान्स चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या जगातील सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक बॉलीवूड सौंदर्यवतीही हजेरी लावतात.

यामध्ये माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचाही समावेश आहे. तिने यंदा कान्समध्ये पदार्पण केले आणि रेड कार्पेटवर शोभा वाढवली.

पांढर्‍या पोशाखात मानुषी सिंड्रेलापेक्षा कमी दिसत नव्हती. तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

(sara ali khan manushi chhillar esha gupta at cannes film festival 2023)

मानुषीने अक्षय कुमार विरुद्ध 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा सिनेमा जरी फ्लॉप झाला असला तरी मानुषीच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक झालं.

मानुषी छिल्लरने कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. तिने नेकपीस आणि कमीतकमी मेकअपसह फोवरीचा पांढरा गाऊन घातला होता. तिचा आत्मविश्वास रेड कार्पेटवर पाहण्यासारखा होता.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 16 मे पासून सुरू झाला असून तो 27 मे पर्यंत चालणार आहे. मानुषी व्यतिरिक्त सारा अली खाननेही सुद्धा या फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केलं.

भारतीय पोशाखात ती खूपच सुंदर दिसत होती. उर्वशी रौतेलाही पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली.

ईशा गुप्ता, अनुष्का शर्मा, मृणाल ठाकूर, ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर, दीपिका पदुकोण, आदिती राव हैदरी आणि प्रियांका चोप्रा देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 हा जगातील बहुप्रतिक्षित चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. महोत्सवात जगभरातील समीक्षकांनी नावाजलेले चित्रपट प्रदर्शित केले जातात. हा महोत्सव फ्रान्समध्ये 16 मे ते 27 मे या कालावधीत होणार आहे.

रुबेन ऑस्टलंड यांची 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी अध्यक्षपदी घोषणा करण्यात आली आहे. उद्योग व्यावसायिकांसाठी महोत्सवाची तिकीट किंमत ₹5 लाख ते ₹25 लाख दरम्यान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT