sara ali khan, sara ali khan trolled, sara ali khan news SAKAL
मनोरंजन

Sara Ali Khan: मी मंदिरात जाणारच..! ट्रोल झाल्यानंतर सारा अली खानचं मोठं वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलंय

Devendra Jadhav

Sara Ali Khan Trolled News: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलंय. कारण सुद्धा तसंच आहे. सध्या सारा आणि अभिनेता विकी कौशल त्यांच्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे.

दोघही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर मागे सोडताना दिसत नाही आहे. नुकतेच दोघही आयपीएलच्या फायनल मॅचमध्ये पोहचले होते. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघही फिरतच नाही तर मंदिरांमध्ये जावुन पुजाही करत आहे.

(Sara Ali Khan Slams Trolls Attacking Her For Mahakal Visit, Says 'My Personal Beliefs Are My Own')

अलीकडेच सारा अली खान आधी अजमेर शरीफला पोहोचली आणि नंतर महाकालेश्वर मंदिरात गेली. यामुळे काही लोकांनी अभिनेत्रीला फटकारले.

सारा अली खानने आता या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून, ज्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्यांना चोख उत्तर दिले आहे.

सारा अली खान सध्या तिच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आपल्या चित्रपटासाठी आशीर्वाद घेण्यासाठी ती महाकालेश्वर मंदिरात गेली होती.

तेथे साराने पूजा करून मस्तक टेकवून आशीर्वाद घेतले. या गोष्टीमुळे सारा अली खानला युजर्सच्या प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. अखेर यावर सारा अली खानने मौन सोडलंय

साराने मीडियाला सांगितले की, 'मी हे प्रामाणिकपणे सांगितले आहे आणि पुन्हा सांगेन की मी माझे काम खूप गांभीर्याने घेते. मी जनतेसाठी, तुमच्यासाठी काम करते.

जर तुम्हाला माझे काम आवडले नाही तर मला वाईट वाटेल. पण हा माझा वैयक्तिक विश्वास आहे, माझा वैयक्तिक विश्वास आहे. बंगला साहेबांइतक्याच आवेशाने मी अजमेर शरीफला जाते, त्याच श्रद्धेने महाकाल मंदिरात जाते. आणि मी जात राहीन.

कोणाला काय बोलायचं ते बोलू शकतात. मला काही अडचण नाही. पण तुम्ही कुठेही जाल तिथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथली ऊर्जा. माझा तिथल्या उर्जेवर विश्वास आहे." असं सारा म्हणते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT