सारा अली खाननं (Sara Ali Khan) बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पणापासूनच आपलं नाव कमावण्यास सुरुवात केली. तिचं दिसणं,तिचा अभिनय,नृत्य अशा एकंदरीत सर्वच गोष्टींवर तिचे चाहते फिदा आहेत. २०२० मध्ये कार्तिक आर्यनसोबत आलेला तिचा 'लव्ह आज कल २' हा सिनेमा फारसा चालला नसला तरी त्यातली सारा मात्र भाव खाऊन गेली. 'अतरंगी रे' आणि 'कुली नं वन' हे तिचे दोन सिनेमे ओटीटी वर प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांनी फारशी कमाल दाखवली नसली तरी या सिनेमातील गाण्यांवर थिरकलेली सारा सर्वांनाच अधिक भावली. आता लवकरच सारा लक्ष्मण उतेकरच्या 'गॅसलाइट' सिनेमात विकी कौशल आणि विक्रांत मसीसोबत दिसणार आहे.
आता बातमी कानावर पडतेय की सारा लवकरच १९४२ च्या भारत छोडो आंदोलनावर आधारित ऐतिहासिक सिनेमात दिसणार आहे. 'एक थी डायन' सिनेमाच्या दिग्दर्शिका कनन अय्यर या ऐतिहासिक सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत, करण जोहर या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळत असल्याचं बोललं जात आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. ऐतिहासिक भूमिका साराच्या पहिल्यांदाच वाट्याला आली आहे,त्यामुळे इतक्या लवकरच एवढी मोठी भूमिका सारा कशी पेलेल यावर सध्या इंडस्ट्रीतच नाही तर साराच्या चाहत्यांमध्ये देखील चर्चा रंगली आहे. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात महत्वपूर्ण भूमिका केलेल्या अरुणा आसफ अली यांची भूमिका सारा साकारणार का याविषयी देखील बोललं जात आहे.
सारा काही दिवसांपूर्वी चर्चेत होती,ते पापाराझीला तिनं पोज द्यायला नकार दिल्यामुळे. साराचा फोटो काढण्यासाठी पापाराझीनं गर्दी केली असताना तिला चुकून एकाचा धक्का लागला तेव्हा सारा रागावून पोज न देताच गाडीत जाऊन बसली. आणि रागानं म्हणाली,''मी फोटोसाठी उभी राहणार नाही. तुम्ही धक्के मारता''. तिनं फक्त गाडीतून जाताना कॅमेऱ्याच्या दिशेनं स्माईल केलं आणि हात हलवला अन् निघून गेली. अन्यथा एरव्ही पापाराझीला थांबून फोटोसाठी पोज देणारी सारा यावेळी मात्र पहिल्यांदाच भडकलेली पाहून पापाराझ देखील आश्चर्यचकित झाले. बहुधा साराला अशाप्रकारे रागावलेलं पहिल्यांदाच सर्वांनी पाहिलं असाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.