Sara Khan Shantanu Breakup News fans shocked : टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस सारा खान ही सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. या सगळ्यात तिच्याबाबत समोर आलेल्या माहितीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सारा ही बऱ्याच दिवसांपासून शंतनूला डेट करत होती. आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे.
खरं तर सारा आणि शंतनू यांनी आपल्या नात्याला आणखी पुढे नेत लग्न करण्याचाही विचार केला होता. मात्र त्यावर आता पाणी फेरल्याचे दिसून येत आहे. सारानं सोशल मीडियावर केलेल्या त्या पोस्टनं सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला आहे. त्यातून तिनं तिच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासाही केला आहे.
लग्नापूर्वीच त्यांच्या नात्याला ग्रहण लागले आहे. सारानं शंतनूसोबतच्या नात्यावर ब्रेक अप झाल्याचं म्हटलं आहे. सारा आणि शंतनू हे लग्नापूर्वीच वेगळे झाले होते. त्याविषयी फारशी कुणाला माहिती नव्हते. आता तिनं सोशल मीडियावर शेयर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या कमेंटस केल्या आहेत.
सारा अन् शंतनू हे परस्पर संमतीनं वेगळे झाले आहेत असे म्हटले आहे. सारानं तिच्या स्टोरीमध्ये म्हटले आहे की, मी आणि माझ्या पार्टनरनं सहमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही वेगवेगळ्या दिशेनं आमचा प्रवास सुरु करु. असं असलं तरी एकमेकांचा आदर करत राहू.
सारा ही बिग बॉस ४ मध्ये दिसली होती. त्यात तिचं अली मर्चंटवर प्रेम जडलं होतं. त्यांनी बिग बॉसमध्येच लग्नही केलं होतं. त्याची खूप चर्चाही झाली होती. मात्र त्या शो मधून बाहेर आल्यावर त्यांचं ते लग्न मोडलं आणि ते वेगळे झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.