Sarang Sathaye On Toll collection Esakal
मनोरंजन

Sarang Sathaye: रिफंड मिळत नाही म्हणून सारंगने टोलनाक्यावर चक्क १५ मिनिट रोखलं होतं ट्रॅफिक

Vaishali Patil

Sarang Sathaye On Toll collection: गेल्या काही दिवसापासून मुंबई-पुणे महामार्गावरील टोलनाका हा चर्चेचा विषय बनला आहे. टोल नाक्यावरुन बराच गदारोळ सुरु आहे. त्यातच मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करतांना अनेकांना नाहक त्रासाला सामोर जावं लागत आहे. इतकच नाही तर काही ठिकाणी तर विनाकारण टोल दोन वेळा घेण्यात येतो.

या महामार्गावरून जातांना जर रस्त्यात काही कामासाठी लोणावळ्याला थांबले तर जास्तीचा किंवा दुप्पट टोल घेतला जातो. यामुळे सर्वसामान्य माणसांसोबत अनेक कलाकारांचाही विनाकारण मनस्ताप होतो. काही दिवसांपासून काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत यावर टीका केली होती. त्याचबरोबर त्यांनी यावर टीकाही केली होती.

आता त्यातच आणखी एका मराठमोळ्या कलाकारानं पोस्ट शेयर करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे तो म्हणजे सारंग साठ्ये. सारंग हा प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो. त्याला देखील मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवास करतांना अशाच प्रकारचा नाहक त्रास सहन करावा लागला.

याबद्दल त्याने ट्विट करत लिहिले की, "हे लोणावळ्यात नेहमीच घडत. महामार्गावरून प्रवास करताना रिफंड मिळविण्यासाठी 15 मिनिटे ट्रॅफिकमध्ये थांबावं लागले. नक्कीच हा कोणत्यातरी प्रभावशाली व्यक्तीचा टोल नाका असावा. याबाबत यापुर्वी अनेकांनी हा मुद्दा उपस्थीत केला आहे त्यामुळे राज्य सरकारनं याकडे गाभीर्यांने लक्ष द्यावे."

ही पोस्ट शेयर करतांना त्याने राज्य सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आहे.

Sarang Sathaye On Toll collection:

दुसऱ्या वृत्तसंस्थेसोबत बोलतांना त्याने सांगितलं की, "अनेकदा टोल प्लाझावर काम करणारे अधिकारी हे तेथील फास्ट टॅग काम करत नसल्याचं सांगतात. त्यामुळे प्रवासात घाईत असणारी लोक तिथे रोखीने पैसे भरतात मात्र त्यानंतर जवळपास दोन-तीन तासांनंतर मेसेज येतो की फास्टटॅगद्वारे टोलची रक्कम कापली गेली आहे. असं माझ्यासोबतही घडलं आहे."

काही दिवसांपुर्वी मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकार ऋजुता देशमुख आणि कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनी देखील टोलनाक्यावर दोनदा टोल भरावा लागल्याने संताप व्यक्त करत पोस्ट शेयर केली होती.

त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानचा टोलनाका आता पुन्हा चर्चेत आहे. या प्रकरणाकडे सरकार लक्ष देते का आणि काही कार्यवाही करण्यात येईल का असे अनेक प्रश्न नेटकरी या पोस्टच्या कमेंटमध्ये विचारत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

Sports Bulletin 5th Oct 2024 : मुंबईने २७ वर्षांनी जिंकला इराणी चषक ते भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलचे समीकरण, एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT