मनोरंजन

अशीही आठवण : इरफानच्या विनंतीवरुन टाळली पाेलिसी कारवाई

सुनील शेडगे

नागठाणे (जि.सातारा) : "इरफान खान हे जितके प्रतिभासंपन्न अभिनेते होते, तितकेच ते संवेदनशील अन्‌ सहृदयी माणूसही होते. त्यांच्या याच गुणविशेषाची आठवण बिचुकले (ता. कोरगाव) येथील प्राथमिक शिक्षक चंद्रकांत चव्हाण यांनी जागविली.
 
बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या कसदार अभिनयाने संस्मरणीय भूमिका करणाऱ्या, पद्मश्रीसह राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटविणाऱ्या इरफान खान यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्यातील संवेदनशीलतेचे रूप श्री. चव्हाण यांनी प्रत्यक्ष अनुभविले. ती आठवण गडद करताना चव्हाण सांगतात, "1996 मध्ये मी मुंबईतील परळच्या शिरोडकर कॉलेजमध्ये शिकत होतो. माझं वास्तव्य तेव्हा गोरेगाव (पश्‍चिम) इथल्या शासकीय वसतिगृहात होते. माझी मोठी बहिण सुद्धा गोरेगावमधील इंदिरानगर भागात राहायला होती. वसतिगृहात असताना एके दिवशी रात्री दहाच्या सुमारास आमचा एक नातेवाईक मुलगा तिथे आला. त्याने तुमच्या बहिणीच्या पतीचा अपघात झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर मी अन्‌ माझा मित्र किरण लगेचच अपघातस्थळी गेलो. तिथे गेल्यानंतर आमच्या मेहुण्यांना अंधेरी येथील कूपर हॉस्पिटलमध्ये हलविल्याचे सांगितले. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो, तेव्हा त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्‍चर झाल्याचे समजले.

ज्या गाडीने त्यांना उडविले होते, ती गाडी अभिनेते इरफान खान स्वतः चालवीत होते, अशीही माहिती समोर आली; परंतु या अपघातानंतर काही वेळातच तेही हॉस्पिटलमध्ये आले. "बहिणीचे माझ्याशिवाय दुसरे कुणीही पाहणारे नव्हते. हे समजल्यावर इरफान खान माझ्याशी बोलले. त्यांनी पोलिस केस न करण्याची विनंती केली. हॉस्पिटलचा सर्व खर्च करण्यासही ते तयार झाले. इतकेच नव्हे, तर त्यानंतर त्यांनी आपल्या स्वीय सहायकास बोलावून घेतले. हॉस्पिटलचा सर्व खर्च भागविण्याच्या सूचना त्याला दिल्या. त्यानंतरही मेहुण्यांच्या प्रकृतीची ते आत्मीयतेने चौकशी करत. एक बडा अभिनेता असूनही त्यांच्यातील माणूसपणाचे हे दर्शन थक्क करणारे होते, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

WorldInternationalDanceDay : घुंगराचा नाद पुन्हा घुमवूच : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर

सातारा शहरात कोरोनाचा शिरकाव; सदरबझारमधील महिला

घरी रहा सुरक्षित रहा : सातारकरांसह कऱ्हाडकरांसाठी महत्वाची बातमी 

ऋषी कपूर म्हणजे जॉली माणूस...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

आजचे राशिभविष्य - 15 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT