Rakul Preet SIngh & Satish kaushik Instagram
मनोरंजन

Satish kaushik:'अजून किती खालच्या पातळीला जाऊन वागाल..',सतिश कौशिकांच्या निधनावर प्रतिक्रिया देणारी रकुल प्रीत ट्रोल

सतिश कौशिकांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करणाऱ्या रकुल प्रीत सिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय,आणि तो पाहिल्यावर जो-तो तिला सुनावतोय.

प्रणाली मोरे

Satish kaushik यांच्या निधनानं संपू्र्ण बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं दुःख व्यक्त केलं आणि सतिश कौशिक यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

रकुल प्रीतनं देखील सतिश कौशिक यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली पण हसत हसत..तिच्या चेहऱ्यावर किंचितही दुःख दिसलं नाही. सोशल मीडियावर लोक त्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल करताना दिसत आहेत.

'छत्रीवाली' सिनेमात रकुलनं सतिश कौशिक यांच्यासोबत काम केलं होतं. हा सतिश कौशिक यांचा शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा ठरला.

रकुलनं सतिश कौशिक यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत म्हटलं,''खूपच शॉकिंग न्यूज ऐकायला मिळाली..अजूनही बातमीवर माझा विश्वास बसत नाही. ते नेहमीच हसत-खेळत वावरायचे,वजन देखील कमी करत होते. वर्कआऊट करायचे. ही खूप दुःखद घटना आहे''.(Satish kaushik: rakul preet gets trolled for smiling on condolence video)

रकुल प्रीतनं दुःख तर व्यक्त केलं पण यादरम्यान तिच्या चेहऱ्यावर स्माइल होतं. आणि हेच नेमकं सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना खटकलं. ते आता तिला चांगलंच सुनावताना दिसत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'हिला काहीच फरक पडलेला दिसत नाही. आजकाल माणुसकी नावाची गोष्ट उरलीच नाहीय. हिला पैशानं भरलेली बॅग द्या..मग बघा हिचे इमोशन्स'.

आणखी एकानं लिहिलं आहे की, 'हा काय मुर्खपणा? अशी हसत-हसत दुःखद बातमीवर प्रतिक्रिया दिली जाते का? अजून किती खालच्या पातळीला जाऊन वागाल'.

तर कुणीतरी लिहिलं आहे,'कोणत्या अॅंगलने ही दुःखी दिसते'.

एका नेटकऱ्यानं ट्रोल करत लिहिलं आहे की,'हिला एवढं दुःख झालं की थेट सलोनला पोहोचली. तो दिग्ग्ज माणूस होता. थोडी तरी लाज बाळगा'.

हेही वाचा: डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...

सतिश कौशिक यांचे बुधवारी रात्री उशिरा दिल्लीत हार्ट अटॅकने निधन झाले. सतिश आपली पत्नी आणि मुलीसोबत दिल्लीत होळीचा सण साजरा करण्यासाठी आले होते. बिजवासनमध्ये एका फार्म हाऊसवर ते उतरले होते.

दिल्लीत एका मित्राला भेटून गाडीनं फार्महाऊसवर जाताना त्यांची तब्येत बिघडली. तिथून त्यांनीच ड्रायव्हरला हॉस्पिटलला गाडी नेण्यास सांगितले. गुरुग्राम येथील फोर्टिस हॉस्पिटलला त्यांना नेलं पण शेवटी मृत्यूनं त्यांना गाठलं. आज(९ मार्च) मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT