satyashodhak fame sandeep kulkarni talk about animal ranbir kapoor bobby deol  SAKAL
मनोरंजन

Animal Movie: "मी 'अ‍ॅनिमल' मध्यंतरापर्यंत पाहिला अन्..." ज्योतिबा साकारणाऱ्या संदीप कुलकर्णीचं मोठं वक्तव्य

'अ‍ॅनिमल' पाहिल्यावर संदीप कुलकर्णीने त्याचं मत व्यक्त केलंय

Devendra Jadhav

Animal Movie Sandeep Kulkarani: शुक्रवारी ५ जानेवारीला 'सत्यशोधक' सिनेमा रिलीज झालाय. 'सत्यशोधक' सिनेमात संदीप कुलकर्णीने महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारली आहे.

संदीप कुलकर्णीने अलीकडेच 'माझा कट्टा'ला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने 'अ‍ॅनिमल' बद्दल मोठं वक्तव्य केलं. काय म्हणाला संदीप? जाणून घ्या.

संदीप कुलकर्णीचं 'अ‍ॅनिमल'बद्दल मोठं वक्तव्य

संदीप कुलकर्णी हे 'सत्यशोधक' सिनेमात महात्मा फुलेंची भूमिका साकारत आहे. मुलाखतीत संदीप कुलकर्णीला 'अ‍ॅनिमल' बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी संदीप म्हणाला, "मी 'अ‍ॅनिमल' मध्यंतरापर्यंत बघितला आणि मी उठलो. माझ्यासाठी हा सिनेमा नाही." असं रोखठोक मत संदीपने व्यक्त केलंय.

संदीप कुलकर्णी हुबेहुब महात्मा फुले

‘सत्यशोधक’ सिनेमाच्या पोस्टर, टीझरमध्ये झळकणारे अभिनेते संदीप कुलकर्णी पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महात्मा ज्योतिरावांसारखे हुबेहुब दिसणाऱ्या संदीप कुलकर्णी यांच्या लूकची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत होत आहे.

वेशभूषा आणि रंगभूषा अगदी योग्य जमून आल्याने खरेच महात्मा ज्योतिराव फुले समोर आहेत असा भास होतोय. त्यामुळे फुलेंच्या भुमिकेसाठी अभिनेत्याची योग्य निवड आणि लूकचा संपूर्ण अभ्यास करूनच ही भूमिका साकारली गेल्याचे स्पष्ट होत आहे. सिनेमा रिलीज होताच संदीपच्या अभिनयाचं कौतुक होतंय.

सत्यशोधक सिनेमाची रिलीज डेट बदलली, आता या दिवशी येणार सिनेमा भेटीला

समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित सत्यशोधक सिनेमा आधी १० नोव्हेंबरला रिलीज होणार होता. आता सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे.

रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारी, २०२४ रोजी प्रदर्शित झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

स्टार प्रवाहच्या नायिकेची झी मराठीवर एंट्री; 'लक्ष्मी निवास' मालिकेत देणार पाठक बाईंना टक्कर; पाहा नवा प्रोमो

Mumbai Vidhansabha Result: दक्षिण मुंबईतील कौल नक्की कोणाला? मनसेमुळे लढतीत रंगत!

Jaggery Poha Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा गोड गुळाचे पोहे, लगेच लिहा रेसिपी

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT