Saurabh Ganguli Biopic: आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत महान खेळाडू, यशस्वी कॅप्टन म्हणून नाव कमावलेल्या सौरव गांगुलीच्या बायोपिकची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. आता बातमी आहे की आयुष्मान खुराना मोठ्या पडद्यावर सौरव गांगुलीच्या भूमिकेत दिसू शकतो.
बोललं जातंय की निर्मात्यांनी भारतीय क्रिकेटर्सच्या आयुष्यावर बनलेल्या या सिनेमासाठी आयुष्मानला कास्ट केलं गेलं आहे. याआधी दादा च्या बायोपिकसाठी रणबीर कपूरचं नाव समोर येत होतं. आता आयुष्मानच्या नावासोबतच कळत आहे ते सिनेमाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या करणार आहे.(Saurabh Ganguly Biopic Update Ayushmann Khurrana in sourav Ganguly)
PeepingMoon च्या रिपोर्टनुसार दावा केला जात आहे की लव्ह फिल्म्स या सिनेमाची निर्मिती करत आहे आणि आयुष्मान खुराना सोबत या सिनेमाविषयी बातचीत केली जात आहे. सूत्रांनी दावा केला आहे की, निर्माते काही महिन्यांपासून या सिनेमा संदर्भात आयुष्मानच्या संपर्कात आहेत,बोलणी सुरू आहेत. आणि आता एका चांगल्या लेवलवर बोलणी पोहोचली आहेत आणि अधिकृतरित्या सर्व गोष्टी फायनल होण्यासाठी काही फॉर्मॅलिटी बाकी आहेत. निर्मात्यांना विश्वास आहे की आयुष्मान,जो राइट हॅंड बॅट्समन आहे तो सौरव गांगुलीच्या भूमिकेसाठी सगळ्यात उत्तम पर्याय आहे.
सूत्रांचे असे देखील म्हणणं आहे की,सौरभ गांगुलीनं देखील आपल्या बायोपिकसाठी आयुष्मानच्या निवडीला संमती दिली आहे आणि लवकरच तो आयुष्मानला वैयक्तिक भेटणार देखील आहे. आयुष्मानला शूटिंग करण्याआधी क्रिकेट ट्रेनिंग देखील घ्यावी लागेल,जी काही महिने चालेल.
यादरम्यान अफवा होती की 'जुबली' सिनेमाचा दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने हा या बायोपिकचं दिग्दर्शन करणार होता. पण आता कळंतय की त्यानं यासाठी नकार दिला आहे. आणि ऐश्वर्या रजनीकांतकडे दिग्दर्शनाची धुरा सोपवण्यात आली आहे.
आयुष्मान खुराना आणि ऐश्वर्या या दोघांकडे देखील काही सिनेमे पाइपलाइनमध्ये आहेत. आयुष्मानला लवकरच 'ड्रीम गर्ल २' मध्ये अनन्या पांडे,परेश रावल,अन्नू कपूर,राजपाल यादव,मनोज जोशी,असरावी,अभिषेक बॅनर्जी,सीमा पाहवा आणि मंजोत सिंग यांच्यासोबत पाहिलं जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.