एका साध्या व्हिडीओ अल्बममधनं अभिनयक्षेत्रातला आपला प्रवास सुरू केलेल्या सायलीनं आपल्या अभिनयाच्या जोरावर हळूहळू नाटक,मालिका ते थेट ७० एम.एमच्या सिल्व्हर स्क्रीन पर्यंत मजल मारली. 'काहे दिया परदेस'सारखी मालिका ते आताच्या सुपरहीट 'झिम्मा' सिनेमातील सायली संजीवचा प्रवास म्हणजे 'साधी-सरळ मुलगी' ते 'बोल्ड गर्ल' असाच म्हणावा लागेल. सुरुवातीला अगदीच लाजरीबुजरी इमेज असलेल्या सायलीनं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' सिनेमात थोडसं बोल्ड कॅरेक्टर साकारलं अनं किसिंग सीनही दिला त्यानंतर मात्र रातोरात त्याची चर्चा झाली. मुळात 'गर्ल नेक्स्ट डोअर इमेज' असलेली सायली असा सीन देऊच शकत नाही यावर चर्चेला जोर आला. आणि ती बातमी हेडलाईनमध्ये चमकू लागली.
पण सायलीचं यावर म्हणणं आहे,''एखादा किसिंग सीन किंवा अगदी इंटिमेट सीन करायचा असेल तर तुमचा कम्फर्ट महत्त्वाचा. जर कम्फर्ट नसेल तर भूमिकेची गरज आहे म्हणून जबरदस्तीने करायचा, तर तसंही करू नये. मी तरी याबाबतीत हेच निकष मानते. मला कोणत्याही एका इमेजमध्ये अडकून पडायचं नाहीय. मला भूमिकांच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करायचेत असंही सायलीनं आवर्जुन सांगितलं. सायलीनं आतापर्यंत अनेक गूड लूकिंग अॅक्टरसोबत काम केलंय पण करिअरच्या पिकला असताना तिने 'आटपाडी नाईट्स' या सिनेमात नॉर्मल लूक असलेला आणि लीडचा हिरो नसलेल्या प्रणव रावराणेसोबतही नायिका म्हणून काम केलं. पण यावर तिचं म्हणणं आहे,माझ्यासाठी लूक महत्त्वाचा नाही तर समोरच्या कलाकाराचा अभिनय,सिनेमाची कथा हे मुद्दे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत''.
सायली संजीवची संपूर्ण मुलाखत इथे आपण ऐकू शकता.
सायली पुढे असंही म्हणाली की,''मी जर अभिनेत्री बनले नसते तर नक्कीच राजकीय विश्लेषक झाले असते. राजकारण मला फार आवडतं. मी त्याच्याशी संबंधित खूप बातम्या पाहते. पण हेच सांगताना तिनं नमूद केलं की राजकारणातलं सत्ताकारण मला आवडत नाही. तिला बाळासाहेब ठाकरे,शरद पवार आणि राज ठाकरे हे नेते फार आवडतात असंही तिने सांगितलं. बाळासाहेब कधीही सत्तेवर नव्हते पण तरीही सत्ता त्यांच्या हातात होती हे मला फार आवडायचं. म्हणजे त्याच्या नुसत्या एका हाकेवर महाराष्ट्र बंद होताना पाहिलाय मी. तर शरद पवार म्हणजे जे नेहमी पुढचा विचार करून राजकारण करतात असे हुशार नेते. आणि राज ठाकरेंच्या भाषणांची तर मी फॅन आहे. क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत आपलं खूप चांगल्या मैत्रीचं नातं आहे. लोकांनी उगाच चुकीच्या बातम्या पसरवल्या. आता त्यामुळे ऋतुराजने काही चांगली कामगिरी केली तर मी त्याचं उघडपणे अभिनंदनही करू शकत नाही".
सायलीला लग्नाविषयी आणि जोडीदार कसा निवडणार याविषयी विचारले असता ती म्हणाली,''लग्न कधी करणार माहीत नाही पण जोडीदार मात्र माझ्या बाबांसारखाच निवडणार. माझं माझ्या वडीलांवर फार प्रेम आहे. अर्थात सगळ्याच मुलींचं असतं. माझं आयुष्य माझे बाबा आहेत त्यामुळे मी ज्याच्यासोबत पुढे आयुष्य काढणार आहे तो बाबांसारखाच शोधणार''. सायली संजीवच्या वडिलांचं ३० नोव्हेंबर २०२१ रोजी निधन झालं. ही मुलाखत तिने ज्या दिवशी ई-सकाळला दिली आणि बाबांविषयी मुलाखतीत भरभरून बोलली त्याच दिवशी तिच्या वडिलांची प्राणज्योत मालवली. ते ६३ वर्षांते होते. सकाळ डिजिटलकडून सायलीच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.