Sayali Sanjeev 
मनोरंजन

लग्नाबद्दल सायली संजीव म्हणते..

सकाळ ऑनलाइन

टेलिव्हिजन आणि चित्रपट या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव हिच्या बस्ता या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २१ मार्च रोजी झी टॉकीजवर होणार आहे. त्या निमित्ताने सायलीने चित्रपटाबाबत आणि लग्नसंस्थेबाबत काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. 

१. लग्नसंस्थेवर आधारित चित्रपट स्वीकारताना तुझा काय भावना होती?
- मला या चित्रपटाचा विषय खूप आवडला आणि त्यातील माझ्या वाट्याला आलेली भूमिका मला खूपच भावली. लग्नसंस्थेवर आपण अनेकदा भाष्य करतो, पण एका शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न यावर प्रकाश टाकणारी ही कथा आहे. त्यामुळे हा उत्तम विषय मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटाला मी काहीच विचार न करता लगेच स्वीकारलं.

२. तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांग.
- मी या चित्रपटात स्वाती या एका शेतकऱ्याच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तिने लहानपणापासून तिच्या वडिलांचा त्रास, त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत बघितली आहे. त्यामुळे तिला शेतकऱ्याशी लग्न करायचं नाही आहे. तिला एका नोकरदार मुलाशी लग्न करायचंय. गावाकडची बऱ्यापैकी शिकलेली ही स्वाती भावनिक न होता खूप प्रॅक्टिकल विचार करणारी आहे.  

हेही वाचा : "मी तर निंदकाशीच लग्न केलंय"; निवेदिता यांनी अशोक सराफांबद्दल असं का म्हटलं?

 ३. या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षकांकडून तुला कशी प्रतिक्रिया मिळाली?
- मला या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. मनोरंजनासोबतच एक चांगला संदेश या चित्रपटाने दिला आहे असा मला बऱ्याच लोकांकडून प्रतिसाद मिळाला. खूप कौतुकदेखील झालं.  

४. तुझा लग्नसंस्थेवर किती विश्वास आहे? हल्ली खूप थाटामाटात, भरपूर पैसा खर्च करून लग्न करण्याचा ट्रेंड आहे. यावर तुझं काय मत आहे?
- माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. मला असं वाटतं की लग्नसोहळा कसा असावा हा त्या प्रत्येक मुला-मुलीचा वैयक्तिक निर्णय आहे. काहींना खूप मोठ्या स्तरावर लग्न सोहळा केलेला आवडतो तर काहींना थोडक्यात आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करायला आवडतं. ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे.  

५. हा चित्रपट शूट करत असतानाचा एखादा ऑफस्क्रीन किस्सा जो तू प्रेक्षकांसोबत शेअर करू इच्छितेस?
- माझे सेटवर खूप लाड व्हायचे. मी एका वेगळ्या चित्रपटासाठी थोडं वजन वाढवलं होतं आणि बस्तासाठी मी एक गाणं शूट करत होती, ज्यात अक्षयला मला उचलून घ्यायचं होतं. त्यात असा सीन होता की मी धावत येते आणि मग अक्षय मला उचलून घेतो आणि हा एक रोमँटिक सीन असल्यामुळे आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर खूप रोमँटिक एक्सप्रेशन्स होते. पण हळूच मी अक्षयला बोलत होती की मला खाली नको पाडू. त्यामुळे जेव्हापण आम्ही ते गाणं बघतो तेव्हा आम्हाला खूप हसू येतं.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'ED प्रकरणात कोर्टानं मला क्लीन चिट दिलीये, शरद पवारांना याची माहिती नाही'; काय म्हणाले मुश्रीफ?

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

'PM मोदी उठता-बसता बाळासाहेबांचं नाव घेतात आणि उद्धव ठाकरेंच्याच पाठीत खंजीर खुपसतात'; प्रियांका गांधींचा हल्ला

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Panchang 17 November: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

SCROLL FOR NEXT