Sayani Gupta happy birthday single news social media viral 
मनोरंजन

Sayani Gupta : 'लग्न नको रे बाबा, ते जर केलं तर मला....' अभिनेत्री सयानीच्या मनात कुठल्या गोष्टीची सर्वाधिक भीती?

सयानीच्या जन्मदिनानिमित्तानं तिला चाहत्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं कौतुकही केलं आहे.

युगंधर ताजणे

Sayani Gupta happy birthday single news social media viral : बॉलीवूडमधील निवडक काही चित्रपटांमध्ये तसेच वेब सीरिजमध्ये प्रभावी अभिनय करणाऱ्या सयानीचा चाहतावर्ग मोठा आहे. तिच्या अभिनयाचे चाहते प्रचंड आहेत. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी अॅक्टिव्ह असणाऱ्या सयानीनं वयाची ३८ वर्षे पूर्ण केल्यानंतर देखील तिनं लग्न केलेलं नाही.

सयानीच्या जन्मदिनानिमित्तानं तिला चाहत्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं कौतुकही केलं आहे. काही झालं तरी तिचे चाहते आणि नेटकरी तिला हमखास तिच्या लग्नावरुन प्रश्न विचारतातच. अशात सयानी देखील सगळ्यांना उत्तरं देत बसत नाही. सयानीच्या चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास तिनं आतापर्यत पोशम पा, आर्टिकल १५, मार्गारिटा विद द स्ट्रॉ, सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले आहे.

Also Read - लहान मुलांनी अस्थिर, चंचल असणं हे ADHD चे लक्षण आहे का?

बॉलीवूडमध्ये एका वेगळ्या शैलीच्या अभिनयासाठी सयानीकडे पाहिले जाते. सयानी ही केवळ अभिनेत्रीच नाहीतर की चांगली व्हाईस ओव्हर आर्टिस्ट आणि गायिका म्हणूनही लोकप्रिय आहे. सयानी तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये यशस्वी झाली आहे. मात्र तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यावरुन नेहमीच ट्रोल केले गेले आहे. त्यावर सयानीनं प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

बॉलीवूड आणि ओटीटीवरुन स्वताची वेगळी ओळख तयार केलेल्या सयानीकडे आताच्या घडीला बॉलीवूडमधील अनेक मोठे प्रोजेक्ट आहे. सयानीनं तिच्या बॉलीवूडच्या प्रवासाला २०१२ पासून सुरुवात केली होती. सेकंड मॅरेज डॉट कॉंम हा तिचा पहिला चित्रपट होता. सयानी ही आज प्रथितयश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

मला लग्नाची खूपच भीती वाटते. त्याचे कारण सध्या काळ खूपच बदलला आहे. आपल्याला कुणीतरी फसवून जाईल याची मला भीती वाटते. माझा विश्वासघात होईल असेही मला वाटते. त्यामुळे मला या गोष्टी नको आहेत. अशी प्रतिक्रिया सयानीनं दिली आहे.

सयानी ही मुळची कोलकत्याची राहणारी. पण ती काही काळानंतर दिल्लीत आली. पाच वर्षाची असताना तिनं तिच्या करिअरला सुरुवात केली होती. तिनं पाच वर्षाची असताना रेडिओवर एक जाहिरात केली होती. त्याचे तिला पाचशे रुपये मिळाले होते. तिचे वडील रेडिओशी संबंधित असल्यानं तिला ती संधी मिळाली होती. सयानीनं लहानपणापासूनच कित्येक चित्रपटांना व्हॉईस ओव्हर देण्याचे काम केले होते.

एक गायिका म्हणूनही सयानीची वेगळी ओळख आहे. तिनं पहिल्यांदा आर्टिकल १५ मध्ये गाणंही गायलं होतं. त्याची चर्चा झाली होती. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले होते. त्यात प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणानं प्रमुख अभिनेता म्हणून भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं मोठी कमाई केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT