Scam 2003 The Telgi Story Hansal Mehta Web Series memes viral  esakal
मनोरंजन

Scam 2003 The Telgi Story : मुबारक हो! आप बाप बन गये, स्टॅम्प पेपर पैदा किया, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

सध्या सोनी लिव्हवर प्रदर्शित झालेल्या स्कॅम २००३ द तेलगी स्टोरीची क्रेझ आहे.

युगंधर ताजणे

Scam 2003 The Telgi Story Hansal Mehta Web Serise memes viral : ज्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांची स्कॅम १९९२ नावाची वेबसीरिज पाहिली असेल त्यांना आताची स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी नावाची मालिका देखील आवडेल यात शंका नाही. मात्र यावेळी हंसल मेहता हे या मालिकेचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत. स्कॅम १९९२ चे त्यांनी दिग्दर्शन केले होते.

सध्या सोनी लिव्हवर प्रदर्शित झालेल्या स्कॅम २००३ द तेलगी स्टोरीची क्रेझ आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. या मालिकेचे पाच एपिसोड प्रदर्शित झाले असून अनेकांनी त्याच्या पुढील भाग मेकर्सनं लवकरात लवकर प्रदर्शित करावे अशी मागणी केली आहे. भारतातला आजवरचा सर्वात मोठा घोटाळा म्हणून तेलगीच्या स्टॅम्पपेपर घोटाळ्याकडे पाहिले जाते. तब्बल तीस हजार कोटींचा घोटाळा त्यानं केला होता.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली

तेलगीला या घोटाळ्यात कोणत्या राजकीय नेत्यांनी मदत केली होती त्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मालिकेत आतापर्यत प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये कुणावर थेटपणे भाष्य करण्यात आलेले नाही. स्कॅम २००३ ची सुरुवात तेलगीच्या नार्को टेस्टपासून होते त्यात अर्धगुंगीत असलेल्या तेलगीला अधिकारी तुला कोणत्या नेत्यांनी मदत केली असे विचारतात. यावर तेलगी जे उत्तर देतो ते मात्र विचार करायला लावणारे आहे.

मेकर्सनं अनेक गोष्टी या प्रेक्षकांवर सोडून दिल्या आहेत. आपल्याला जे सांगायचे आहे ते सांगून आता प्रेक्षकांनी त्या गोष्टींचा अर्थ त्या त्या वेळच्या संदर्भानुसार लावावा असे सांगण्यात आले आहे. नार्को टेस्टमध्ये तेलगी म्हणतो की, राजकीय नेत्यांच्या सहकार्याशिवाय तर काहीच होऊच शकत नाही. आणि त्यानंतर स्कॅम २००३ द तेलगी स्टोरीला सुरुवात होते. सोशल मीडियावर आता पुन्हा एका नव्या डायलॉगनं लक्ष वेधून घेतले आहे.

स्कॅम २००३ चे सोशल मीडियावर देखील जोरदार प्रमोशन सुरु आहे. स्कॅम १९९२ प्रमाणेच या मालिकेतील डायलॉगही कमालीचे प्रभावी आहेत. त्यात एक संवाद असा की, मुबारक हो, आप बाप बन गये, स्टॅम्प पेपर पैदा किया अपने.... हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मिळालेला प्रतिसादही मोठा आहे.

याशिवाय काही नेटकऱ्यांनी वेगवेगळे मीम्स शेयर करुन स्कॅम २००३ द तेलगी स्टोरीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

SCROLL FOR NEXT