Scoop Serise  esakal
मनोरंजन

Scoop Serise : 'बारा वर्षे झाली अजुनही तोच प्रश्न छळतोय', जिग्ना वोरा भावूक!

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या स्कूप नावाच्या मालिकेची चर्चा आहे. त्यामधील अभिनेत्रीचं वोरा यांनी कौतूक केलं आहे.

युगंधर ताजणे

Journalist Jigna Vora speaks about Hansal Mehta web series : बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या स्कूप नावाच्या मालिकेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेवर बंदी यावी यासाठी अनेकांनी कोर्टामध्ये धाव घेतल्याचे दिसून आले. गँगस्टर राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजननं तर ही मालिका प्रदर्शित होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केल्याचेही सांगण्यात आले.

प्रसिद्ध पत्रकार जिग्ना वोरा यांच्या 'Behind Bars in Byculla: My Days in Prison' या पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. सध्या ही मालिका खूप चर्चेत असून त्यावर सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरु आहे. सत्य घटनेवर आधारित या मालिकेनं नेटकऱ्यांना कोड्यात टाकले आहे. अनेकांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या स्कूप नावाच्या मालिकेची चर्चा आहे. त्यामधील अभिनेत्रीचं वोरा यांनी कौतूक केलं आहे. लोकांना अजुनही वाटतं की तुम्हाला त्या घटनेमध्ये बळीचा बकरा बनविण्यात आले, याविषयी तुमचे म्हणणे काय आहे, असा प्रश्न वोरा यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर त्या म्हणाल्या की, विश्वास ठेवा मी बारा वर्षांपासून त्याच गोष्टीचा विचार करते आहे. मलाही तेच जाणून घ्यायचे आहे की, मीच का, माझ्याजागी दुसरं कुणी का नव्हते.

त्या मुलाखतीमध्ये जिग्ना वोरा यांना त्यांच्या तुरुंगातील त्या वेदनादायी अनुभवाविषयी विचारण्यात आले होते. तुम्ही मेहता यांची स्कूप नावाची सीरिज पाहिली आहे का, त्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे असे त्यांना विचारण्यात आले होते. यावर त्या म्हणाल्या, बारा वर्षे झाली पण अजुनही त्या गोष्टीच्या वेदना मनात कायम आहे. असं म्हणतात अवघड प्रसंग तुम्हाला खूप काही शिकवून जातात. त्यावेळी मला अनेकांकडून खूप काही शिकायला मिळाले.

गेल्या बारा वर्षांपासून मला कोण आपलं आणि कोण परकं याविषयी कळलं. मी ती मालिकेतील माझी भूमिका करणाऱ्या करिश्मा तन्नाचे कौतूक केले आहे. तिनं खूपच छान काम केले आहे. ते पाहून मला मी पुन्हा त्याच वेगळ्या रुपात दिसले. मालिका चांगली झाली आहे. माझ्यासोबत जो काही विश्वासघात झाला त्यातील व्यक्तींची यादी खूप मोठी आहे. मला सुरुवातीला काहींनी सांगितलं की ते एका कुटूंबासारखे माझ्या पाठीशी आहेत. पण तसे झाले नाही आणि मला खूप त्रास झाला. असे वोरा यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितले.

जुन २०११ मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांची हत्या करण्यात आली होती. त्यात छोटा राजन सहित पत्रकार जिग्ना वोरा यांच्यासह अकरा आरोपी होते. मे २०१८ मध्ये राजन आणि त्यांच्या अन्य आठ जणांना दोषी ठरविण्यात आले होते. त्यानंतर वोरा यांना कोर्टानं दिलासा होता. सध्या प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या स्कूप नावाच्या मालिकेची जोरदार चर्चा असून सहा मालिकेच्या या मालिकेनं सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT