Shaakuntalam Box Office Collection: टॉलिवूडची सुपस्टार लेडी म्हणजे सांमथा ही तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. साउथमध्ये सध्या अनेक चित्रपट आहेत ज्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ते या चित्रपटांची प्रतिक्षा करत आहेत. त्याचपैकी एक चित्रपट होता तो म्हणजे सामंथा रुथ प्रभूचा 'शाकुंतलम'
हा चित्रपट काल चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पौराणिक ड्रामा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले असून नीलिमा गुणा आणि दिल राजू यांनी निर्मिती केली आहे.
'शाकुंतलम'ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळममध्ये धमाल करताना दिसत आहे. या चित्रपटाला सेलेब्सकडून जबरदस्त रिव्ह्यू मिळत असतानाच प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला आहे
दरम्यान, शाकुंतलमच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. शकुंतलम या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली ते जाणुन घेवुया.
समोर आलेल्या आकडेवारी नुसार, समंथा रुथ प्रभू स्टारर शकुंतलम या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5 कोटींची कमाई केली आहे. याशिवाय 'शकुंतलम'ने यूएस बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 125 हजार डॉलर्सची कमाई केली आहे.
शकुंतलम यांनी फारसे प्रमोशन पाहिले नसेल. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 80 करोडच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या हा चित्रपट या वीकेंडला किती कोटींची कमाई करतो हे पाहावे उत्सुकतेचे आहे.
साउथ सेलेब्सनी सामंथा रुथ प्रभूच्या चित्रपटाचे कौतुक केले. तर दुसरी महत्वाची बाब म्हणजे , पुष्पा स्टार अल्लू अर्जुनची 6 वर्षांची मुलगी अल्लू अर्हा हिने देखील या चित्रपटात कॅमिओ रोल केला आहे.
ज्याचे कौतुक करताना अभिनेत्याने चित्रपटातील कलाकारांचे कौतुक करण्याव्यतिरिक्त मुलीसाठीही त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ज्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे.. त्याचबरोबर सोशल मीडियावरही त्याची चर्चा कायम आहे.
'शाकुंतलम' हा चित्रपट फीमेल सेंट्रिकआहे. यात सामंथा रुथ प्रभूने शकुंतलाची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता देव मोहनने चित्रपटात दुष्यंतची भूमिका साकारली आहे.
आदिती बालन, सचिन खेडेकर, प्रकाश राज, अल्लू अर्हा, गौतमी मधु आणि मोहन बाबू यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट कालिदास यांच्या 'शकुंतला' या क्लासिक नाटकावर आधारित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.