Shah Rukh Khan Comment On Ramcharan : अनंत अंबानी अन् राधिका मर्चंटचं प्री वेडिंग हे सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा होताना दिसत आहे. यात बॉलीवूडमधील बडे (Shah Rukh And Ramcharan Viral Video) कलाकारही सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या परफॉर्मन्सनं चाहत्यांना जिंकून घेतल्याचे दिसून आले. या सगळ्यात एका गोष्टीनं मात्र वेगळ्याच वादाला तोंड फुटल्याचे बोलले जात आहे.
सलमान, आमिर आणि शाहरुख यांनी त्या प्री वेडिंगमध्ये रामचरणच्या आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्यावर डान्स केला. मात्र त्यावेळी (Natu Natu Dance In Anant Radhika Pre Wedding) त्यांना त्या डान्सची स्टेप काही केल्या जमेना म्हणून त्यांनी रामचरणला आवाज दिला. शाहरुखनं यावेळी रामचरणच्या नावाची घोषणा केली. त्याला बोलावले. पण त्याचे बोलावणं ही एक प्रकारची शेरेबाजी असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. शाहरुखनं दाक्षिणात्य भाषेची टिंगल करत त्याला बोलावल्याचा आरोप किंग खानवर केला जात आहे.
एकीकडे किंग खान, भाईजान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट यांच्या डान्सचं कौतुक होत असताना दुसरीकडे रामचरणला ज्या प्रकारे स्टेजवर बोलावण्यात आले त्यावरुन त्याचा अपमान झाल्याचे बोलले जात आहे. मेकअप आर्टिस्ट जेबा हसननं त्या सोहळ्याच्या काही क्लिप्स व्हायरल केल्या होत्या. त्यावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे. यात किंग खानचे चाहते मैदानात उतरले असून त्यांनी शाहरुखची बाजू घेतली आहे.
रामचरणची मेक अप आर्टिस्ट जेहानं ती क्लिप व्हायरल करत रामचरणचा अपमान करण्यात आल्याचे म्हटले आहे. अमर उजालानं याबाबत वृत्त दिलं आहे. शाहरुखनं तमिळ भाषेची टिंगल केल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. राम चरण सारख्या कलाकारासाठी हे खूपच अपमानकारक होतं. मी ते पाहून बाहेर निघुन गेली. मी शाहरुखची खूप मोठी फॅन आहे पण त्यानं ज्या प्रकारे रामचरणला स्टेजवर बोलावले ते पाहून वाईट वाटले.
नेटकऱ्यांनी यावरुन किंग खानला सुनावले आहे. एकानं म्हटलं आहे की, मी शाहरुखचा चाहता आहे पण त्यानं ज्या प्रकारे टिप्पणी केली त्यामुळे मला धक्का बसला आहे. अशा निमित्तानं का होईना हा मुद्दा ऐरणीवर आला हे जास्त महत्वाचे आहे. दुसऱ्यानं म्हटलं आहे की, हा केवळ सुपरस्टारचा अपमान नाही तर सगळ्या साऊथ इंडियाचा अपमान आहे. असं करणं ठीक आहे का, असा प्रश्नही त्यानं विचारला आहे.
यामध्ये किंग खानच्या चाहत्यांनी त्याचा बचाव केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, किंग खाननं त्याच्या वन टू का फोरमधील एक डायलॉग म्हणून दाखवला आहे. एसआरकेनं रामचरणला स्टेजवर बोलावण्यासाठी तो संवाद म्हटला होता.
शाहरुखनं रामचरणला हाक मारताना इडली या शब्दाचा वापर केला. त्यामुळे त्यानं अशा प्रकारे रामचरणला वेगळ्या अर्थानं हिणवलं. यामुळे नेटकऱ्यांच्या,चाहत्यांच्या भावना तीव्र झाल्याचे दिसून आले आहे. यानंतर रामचरणच्या मेक अप आर्टिस्टनं केलेल्या पोस्टनं देखील सोशल मीडियावर किंग खानच्या विरोधात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.