Shah Rukh Khan Jawan Movie Special Screening Jitendra Awhad : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा त्याच्या जवान नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. अवघ्या चार दिवसांमध्ये या चित्रपटानं जगभरातून पाचशे कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. याशिवाय या चित्रपटानं वेगवेगळे विक्रमही आपल्या नावावर केले आहे. पठाणनंतर शाहरुखचा हा चित्रपट प्रेक्षकांची तुफान पसंती ठरतो आहे.
याच वर्षी जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंही हजार कोटींची कमाई करुन मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यावेळी त्यावरुन मोठा वादही झाला होता. त्यातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला होता देशभरातील काही थिएटर्समध्ये काही करुन पठाण दाखविला जाणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. आता जवान चर्चेत आला आहे.
Also Read - हॅप्पी हार्मोन...
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा मतदार संघातील १८ ते २५ वर्ष वयोगटातील तरुणांसाठी एक खास उपक्रम आयोजित केला आहे. त्याविषयी अधिक माहिती देणारी पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या जवानांसाठी शाहरुखच्या जवानचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाहरुखचा जवान चित्रपट पाहता येणार आहे.
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये उद्या सायंकाळी सात वाजता त्या खास स्क्रिनिंगचे आय़ोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आव्हाड हे नेहमीच त्यांच्या परखड भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. मात्र त्यावर ठामपणे आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या नव्या पोस्टनंतर देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणे आव्हाड यांच्या त्या पोस्टवर देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. किंग खानच्या जवानविषयी बोलायचे झाल्यास गेल्या आठवड्यात गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं देशभरामध्ये उत्साहाचे वातावरण तयार केले आहे. अॅटली या दाक्षिणात्य दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये शाहरुख, विजय सेतुपति, नयनतारा, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.