Pathaan Movie Sakal
मनोरंजन

Pathaan Box office Collection: 'पठाण' चा दरारा! KGF अन् बाहुबलीचा रेकॉर्ड मोडला..4 दिवसात 400 कोटींचा टप्पा पार

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पहायला मिळतं आहे. हा चित्रपट एकामागून एक रेकॉर्ड तोडतांना दिसतोय. या चित्रपटाची भुरळ शाहरुखच्या चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनाच पडली आहे. पठाणच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाचा दबदबा चौथ्या दिवशीही कायम राहिला

चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन हे रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. चाहते चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. केवळ हिंदीतच नाही, तर सर्वच भाषेत आणि जगभरात हा चित्रपट गाजत आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे नवे आकडे समोर आले आहेत. पठाण हा 4 दिवसात सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जबरदस्त आहे. या चित्रपटाने 4 दिवसात 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आजवर कोणत्याही हिंदी चित्रपटाने असा रेकॉर्ड केलेला नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे ४ दिवस झाले आहेत. आगामी काळात चित्रपटाची अशीच कमाई सुरु असली तर आणखी अनेक विक्रम मोडेल यात काही शंकाच नाही.

शाहरुख खानचा पठाण हा हिंदीत 4 दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आणि त्याने केवळ हिंदीच नाही तर साउथ चित्रपटांनाही त्याने मागे सोडले. प्रभासचा बाहुबली 2 देखील 4 दिवसात जगभरात 400 कोटी कमवू शकला नाही. पण शाहरुख खानच्या पठाणने हे करुन दाखवलं आहे. चित्रपटाची कमाई अशीच सुरू राहिली तर 1000 कोटींचा आकडा दूर नाही.

तरण आदर्शच्या ट्विटनुसार, शाहरुख खानच्या पठाणला हिंदी भाषेत 200 कोटींचा टप्पा पार करायला 4 दिवस लागले. दुसरीकडे, KGF चॅप्टर 2 च्या हिंदी आवृत्तीसाठी 5 दिवस आणि बाहुबली 2 च्या हिंदी आवृत्तीला हा आकडा पार करण्यासाठी 6 दिवस लागले.

चित्रपटाच्या हिंदीतील कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर पठाणने 4 दिवसांत 200 कोटींचा आकडा पार केला आहे. यासोबतच या चित्रपटाने बाहुबली आणि KGF Chapter 2 सारख्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT