Shahrukh Khan as a 'pathaan' Google
मनोरंजन

Pathaan: फुटकळ फी घेऊन शाहरुखनं शूट केलाय 'पठाण', पण आतल्या हाताने होणार मालामाल..

2023 मध्ये रिलीज होणाऱ्या 'पठाण' सिनेमाचं बजेट 250 करोडचं असून नवीन वर्षातला हा पहिला बिग बजेट सिनेमा आहे.

प्रणाली मोरे

Pathaan: शाहरुख खान च्या 'पठाण' सिनेमाची सर्वचजणं सध्या आतुरतेने वाट पहात आहे. बिग बजेट असलेला हा बॉलीवूड सिनेमा 25 जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. 'पठाण' मध्ये शाहरुख खान अॅक्शन हिरो म्हणून आपल्याला दिसणार आहे. पठाण सिनेमा अन् त्यावरनं रंगलेला वाद आपण सगळ्यांनी पाहिला असेल. चला आता थोडं जाणून घेऊया किंग खाननं या सिनेमासाठी घेतलेल्या मानधनाविषयी.(Shah rukh Khan pathaan fee)

पठाण 2023 मध्ये रीलिज होणारा मोठा सिनेमा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सिनेमाचं बजेट जवळपास 250 करोडचं आहे. आता ही माहिती समोर आल्यानंतर अर्थात अनेकांना सिनेमासाठी शाहरुखनं किती मानधन घेतलं होतं हे जाणून घेण्याची इच्छा नक्कीच असेल. ट्रेड एक्सपर्टचं म्हणणं आहे की,पठाण साठी शाहरुखनं 35 ते 40 करोड चार्ज केले आहेत. मात्र हा आकडा ऐकून अनेकजण हैराण झालेयत. कारण शाहरुख सारखा सुपरस्टार इतकी कमी फी घेऊ शकतो यावर कोणाचा विश्वास बसत नाहीय.

यावर ट्रेड एक्स्पर्टनी सांगितलं आहे की,पठाण साठी शाहरुख खाननं कमी फी घेतली आहे,कारण सिनेमात त्याचा प्रॉफिट शेअर देखील असणार आहे. शाहरुख खान या मॉडलवर काम करणारा काही पहिलाच अभिनेता नाहीय. किंग खान व्यतिरिक्त अक्षय कुमार,सलमान खान आणि आमिर खान सारख्या कलाकारांनी या मॉडलवर याआधी काम केलं आहे. हे सगळेच स्टार सायनिंग फी व्यतिरिक्त सिनेमाच्या प्रॉफिटमधला मोठा हिस्सा चार्ज करतात.

'पठाण' विषयी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता पहायला मिळत आहे. एक्सपर्ट्सचा विश्वास आहे की,सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या कारणामुळे पठाणला 35 ते 40 करोडचं ओपनिंग मिळू शकतं. आणि जर असं झालं तर,'पठाण','हॅप्पी न्यू ईयर'चा ओपनिंगचा रेकॉर्ड तोडत पुढे निघून जाईल. हॅप्पी न्यू ईयरने पहिल्या दिवशी जवळपास 36 करोडचा बिझनेस केला होता.

'पठाण' सिनेमाच्या आधी शाहरुख खान 2018 मध्ये 'झिरो' सिनेमात दिसला होता. आता तब्बल चार वर्षानंतर 'पठाण' सिनेमातून शाहरुख कमबॅक करताना दिसणार आहे. सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT