मनोरंजन

Shah Rukh, Rashmika: शाहरुख, रश्मीका एकत्र काम करणार; चाहत्यांसाठी खास खबर

दोघांना पडद्यावर एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी खास ट्रिट असणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि देशाची नॅशनल क्रश रश्मीका मंदाना स्क्रीन शेअर करणार असल्याचं वृत्त आहे. दोघांना पडद्यावर एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी खास ट्रिट असणार आहे. कुठल्या फिल्ममध्ये ते एकत्र काम करताना दिसणार जाणून घ्या. (Shah Rukh Khan Rashmika Mandana to work together Special news for fans Prabhuji Pure Food)

सोमवारी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला यामध्ये शाहरुख रश्मीकासोबत एका फोटासाठी पोझ देताना दिसला. या फोटोनं नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं. यावरुन सोशल मीडियात नेटिझन्सच्या प्रतिक्रियांचा पाऊस सुरु झाला. अनेकांनी त्यांच्या जोडीला खूपच छान अशा प्रतिक्रिया दिल्या, तसेच दोघांना एकत्र काम करताना पाहण्यात मजा येईल, असंही म्हटलं आहे. (Latest Marathi News)

कुठल्या फिल्ममध्ये दिसणार?

शाहरुख आणि रश्मीका 'प्रभुजी प्युअर फूड' या अॅड फिल्ममध्ये अर्थात जाहिरातीत एकत्र काम करणार आहेत. या जाहिरातीचं शूट नुकतंच यशराज फिल्म्सच्या स्टुडिओत पार पडलं. यावेळी या दोघांचा फोटो घेण्यात आला. (Marathi Tajya Batmya)

लवकरच ही जाहिरात प्रदर्शित होणार आहे. पण अद्याप या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अधिकृतरित्या या एकत्र कामाबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही.

चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

रश्मीकासोबतचा फोटो पाहिल्यानंतर शाहरुख कसला भारी दिसतोय, अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे. तर एकानं व्वॉव...जाहिरात पाहिल्याशिवाय राहू शकत नाही, अशी कमेंट दिली आहे. तर हे बेस्ट सरप्राईज आहे, असं आणखी एका युजरनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT