shah rukh khan savage reply to fan who asked him jawan movie duration  SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan Jawan: तु खुप बिझी आहेस भावा.. फॅनने जवानची लांबी विचारल्यावर शाहरुखने दिला भन्नाट रिप्लाय

जवानच्या निमित्ताने शाहरुखने ट्विटरवर #AskSRK हे प्रश्न उत्तरांचं सेशन केलं

Devendra Jadhav

Shah Rukh Khan Jawan AskSRK News: शाहरुखच्या जवान सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. जवान निमित्ताने शाहरुखची सगळीकडे हवा आहे. जवानच्या निमित्ताने शाहरुखने ट्विटरवर #AskSRK हे प्रश्न उत्तरांचं सेशन केलं.

यानिमित्ताने शाहरुखने त्याच्या फॅन्सच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. शाहरुख देत असलेली उत्तरं कायमच त्याचा हजरजबाबीपणा आणि अभिनेत्याचा मिश्कील अंदाज दर्शवतात. असाच एक गमतीशीर किस्सा घडलाय.

(shah rukh khan savage reply to fan who asked him jawan movie duration)

फॅनचा प्रश्न आणि शाहरुखचं उत्तर:

#AskSRK मध्ये शाहरुखच्या फॅनने विचारलं की, किती तासांचा बनवलाय सिनेमा? असा प्रश्न शाहरुखला विचारण्यात आला. तेव्हा शाहरुखच्या उत्तराने त्याच्या फॅन्सना पुन्हा एकदा अभिनेत्याचा खोडकर स्वभाव दिसुन आला.

शाहरुखने फॅनला रिप्लाय दिला की.. "तुम्हाला किती वेळ आहे? तेवढाच सिनेमा बघा. तुम्ही खुप व्यस्त दिसता.." शाहरुखने उत्तर देताच त्याच्या खेळकर स्वभावाचं सर्वांनी कौतुक केलं

शाहरुखच्या जवानचा ट्रेलर तीन भाषांमध्ये रिलीज करण्यात आला. तो हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होत आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर 2 मिनिटे 15 सेकंदांचा आहे.

जवान या चित्रपटात शाहरुख खान आणि नयनतारा मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत विजय सेतुपती, रिद्धी डोगरा, सुनील ग्रोव्हर हे कलाकारही आपल्या अभिनय करणार आहे.

पठाण या चित्रपटानंतर जगभरातील प्रेक्षकांच्या नजरा शाहरुख खानच्या जवानवर खिळल्या आहेत. त्यातच आता ट्रेलर रिलज झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा प्रिव्ह्यू अॅक्शन पॅक आहे. प्रिव्ह्यूची सुरुवात शाहरुख खानच्या आवाजाने होते.

ज्यामध्ये तो म्हणतो, 'मी कोण आहे हे मला माहीत नाही, माझा कोणताही हेतू नाही. स्वतःला विचारा की मी पुण्य आहे की पाप आहे कारण मी देखील तू आहेस. तयार. नाव ऐकले असेल."

चित्रपटात शाहरुख अॅक्शन अवतरात दिसत आहे. त्यासोबत ट्रेलरमध्ये तुम्हाला दिपिकाही दिसेल. तिचा फायटिंग सीन जबरदस्त आहे. 7 सप्टेंबरला जवान रिलीज होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT