बॉलिवूड स्टार शाहरुख खान याला शनिवारी मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं तो संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहहून परत आला होता. शाहरुख खानला मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने रोखलं असल्याची माहिती समोर आली आहे. तो शारजाहवरुन येत होता, त्यावेळी त्याला रोखण्यात आले. त्यामागचं कारण म्हणजे त्याच्याकडे काही महागड्या घड्याळांचे कव्हर होते, ज्यांची किंमत १८ लाख आहे.याकरिता शाहरुखला ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागली.
शाहरुख खान आणि त्याच्या टीमला मुंबई विमानतळावर शुक्रवारी रात्री कस्टम विभागाकडून रोखण्यात आले. त्याच्या बॅगमध्ये अनेक महागडी घड्याळे, बाबून आणि झुर्बक घड्याळे, रोलेक्स घड्याळांचे 6 बॉक्स, स्पिरिट ब्रँडची घड्याळे , ऍपल सिरीजची घड्याळे सापडली. सोबत घड्याळांचे रिकामे बॉक्स देखील सापडले. कस्टम्सने या घड्याळांचे मूल्यांकन केले, त्यानंतर त्यांच्यावर 17 लाख 56 हजार 500 रुपये कस्टम ड्युटी लावण्यात आली.जवळपास तासभर त्यांची चौकशी करुन त्याला ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरुन सोडण्यात आले. शाहरुख दुबईवरुन त्याच्या खासगी चार्टड प्लेनने मुंबई विमानतळावर पोहोचला होता. त्यानंतर त्याला टी३ टर्मिनलवर रोखण्यात आले. सकाळी साधारण ५ वाजता त्याने दंड म्हणून ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरली आणि त्यानंतर त्याला जाऊ दिले गेले.
समोर आलेल्या माहिती नुसार शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवीने 6 लाख 87 हजार रुपये कस्टम पेमेंट केले आहेत. ज्याचे बिल शाहरुख खानच्या बॉडी गार्ड रवीच्या नावावर आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पैसे शाहरुख खानच्या क्रेडिट कार्डवरून भरण्यात आले आहेत. सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त पुगल आणि युद्धवीर यादव यांनी ही संपूर्ण कारवाई केली. यानंतर शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी याला सकाळी ८ वाजता सोडण्यात आले.
त्यानंतर शाहरुख आणि त्याची मॅनेजर पूजा दादलानीला एअरपोर्टबाहेर जाताना स्पॉट करण्यात आले. यावेळी त्याने मोठ्या छत्रीने त्याचा चेहरा लपवताना दिसला. तो पटकन त्याच्या कारमध्ये बसला. तो कॅज्युअल पोशाखात दिसला. त्याने दंड भरला आणि अधिकाऱ्यांना सहकार्य केले. शाहरुख खान 41व्या शारजाह इंटरनॅशनल बुक फेअर (SIBF) ला शारजाह येथे गेला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.