Shaha rukh khan film 'Pathan' boycott on twitter: सध्या बॉलीवूडमध्ये जो सिनेमा येतोय त्याला बॉयकॉट करण्याची मागणी केली जाते. हे बॉयकॉटचं वादळ काही थांबायचं नाव घेत नाही. आधी आमिरचा(Aamir Khan) लाल सिंग चड्ढा, अक्षयचा रक्षाबंधन आणि आता शाहरुखचा (Shahrukh Khan) पठाण जो अजून रिलीज व्हायलाही बराच अवकाश आहे, तरी त्यालाही बॉयकॉट(Boycott) करा असं म्हणून लागलेयत काही प्रतिष्ठित लोक. कच्छ साधु समाजाच्या अध्यक्षांनी शुक्रवारी १२ ऑगस्ट रोजी दावा केला आहे की शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'पठाण' वर बहिष्काराची मागणी सनातनींकडे केल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्या त्या इसमा विरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.(Shaha rukh khan film 'Pathan' boycott on twitter, Is Cm Yogi responsible for that?)
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM Yogi) यांचे गुरुबंधू साधु देवनाथ(Sadhu Devnath) लवकरच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना धमकी देणाऱ्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. स्थानिक मीडियासोबत बातचीत करताना साधु देवनाथ यांनी म्हटलं आहे की,'' सलीम अली नामक इसम जो शाहरुखचा चाहता आहे त्यानं ट्वीटरवर माझं शीर धडापासून वेगळं झालंय हे दाखवणारा एक पोस्टर पोस्ट केला आहे''.
''तो शाहरुख खानच्या पीआर टीमपैकी एक आहे. मी गुरुवारी ११ ऑगस्ट रोजी एक पोस्ट केली होती, ज्यात मी शाहरुखच्या 'पठाण' सिनेमावरही आमिरच्या लाल सिंग चड्ढा सारखा बहिष्कार घालण्याची मागणी सनातनींकडे केली होती. त्या पोस्टच्या प्रतिक्रियांमध्ये माझा तो शीर धडापासून वेगळं केलेला फोटो त्या इसमानं पोस्ट केला आहे''.
साधु म्हणाले की, ''मला वाटतं पोलिसांनी या धमकी मागे नेमका कोण आहे याचा पर्दाफाश करावा आणि सलीमच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी. मी कोणत्याही सिनेमाच्या विरोधात नाही पण अशा अभिनेत्यांच्या विरोधात आहे जे भारतीय चाहत्यांवरच मोठे होतात आणि भारतालाच शिव्या-शाप देतात. मी कोणत्याही जात-धर्म किंवा समाजाच्या विरोधात नाही,पण देश आणि देशबांधवांच्या विरोधात बोलणाऱ्यांना मी सहन करु शकत नाही''.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.