Shahid Kapoor Google
मनोरंजन

शाहिद कपूरच्या ओठांना पडले तब्बल २५ टाके;रक्ताने माखलेला फोटो व्हायरल

सिनेमाच्या सेटवर खेळणं पडलं महागात...

प्रणाली मोरे

शाहिद कपूर म्हटलं की हॅन्डसम हिरो हे शब्द ओठांवर आलेच पाहिजेत. आज वयाच्या चाळीशीतही पोरींना आपल्या प्रेमात सहज पाडायची धमक शाहिदमध्ये आहे बरं का. त्याच्या आजवरच्या अनेक सिनेमातनं रोमॅंटिक आणि रफ-टफ लूक साकारणारा शाहिद प्रत्येक भूमिकेत तितकाच फेव्हरेट बनून जातो. त्यानं साकारलेला 'कबिर सिंग' भरपूर शिव्या देणारा,व्यसनं असणारा असला तरी अनेक तरुणींना त्याच्या लूकने आणि अभिनयानं घायाळ करून गेला असं म्हटलं तर चुकीचं नक्कीच ठरणार नाही. आता यावरनं एक मात्र नक्की होतंय की शाहिदसाठी त्याचे लूक्स किती महत्त्वाचे असतील.

शाहिदचा(Shahid Kapoor) आता 'जर्सी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची काही गाणीही रिलीज करण्यात आली आहेत. या सिनेमात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि त्याचे वडील अभिनेता पंकज कपूरही आहेत. या सिनेमातलाही शाहीदचा लूक प्रत्येक मुलीच्या डोळ्यांना सुखावणारा आहे. पण हाच सिनेमा त्याच्यासाठी समोर संकट घेऊन येणारा ठरला होता हे आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे. या सिनेमात शाहिद आपल्याला क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आता क्रिकेट खेळायचं म्हटलं की क्रिकेटची बॅट आणि बॉल या गोष्टी आल्याच. तर असाच 'जर्सी'च्या सेटवर शाहिद शूटिंग करताना नाही तर वेळ घालवण्यासाठी क्रिकेट खेळत होता. आणि तेव्हाच बॉलचा असा काही दणका त्याच्या ओठांवर लागला की तो जागीच कोसळला.

त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. सुरुवातीला फार लागलं नाही असं वाटून तो आणि त्याची टीम फक्त रुमालाने ओठाचं रक्त पुसत होते. पण जेव्हा रक्ताची धार सुरू होऊन संपूर्ण टी-शर्ट रक्ताने लाल झाला तेव्हा तिथे जमा झालेल्या सर्वांना त्या जखमेचं गांभीर्य कळंल आणि मग कुणीतरी म्हणालं,'डॉक्टरकडे जाऊया का?' त्या प्रसंगानंतर शाहिद बरा होईपर्यंत म्हणजे जवळ-जवळ महिनाभर शूटिंग थांबवण्यात आलं. शाहिदला २५ टाके पडले होते त्यामुळे आता त्याचे ओठ कसे दिसतील या टेन्शनमध्ये सगळे होते. पण बरा होऊन आलेल्या शाहिदला पाहून सगळे 'ऑल ओके' म्हणाले आणि शांतीचा नि:श्वास सोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT