Shahid Kapoor and Vijay Deverakonda  esakal
मनोरंजन

VIDEO: जेव्हा अर्जुन रेड्डी आणि कबिर सिंग एकाच मंचावर येतात; शाहिदनं स्टेजवर विजयला केलं किस, म्हणाला, 'थँक्यू'

priyanka kulkarni

Shahid Kapoor and Vijay Deverakonda: अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मचा काल (19 मार्च) भव्य-दिव्य इव्हेंट पार पडला. या इव्हेंटला विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या दोन्ही स्टार्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहिद कपूर साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाला किस करताना दिसत आहे. शाहिद आणि विजयच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

जेव्हा अर्जुन रेड्डी आणि कबिर सिंह एकाच मंचावर येतात

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहिद कपूर आणि विजय देवरकोंडा स्टेजवर दिसत आहे. त्यांच्यासोबत मृणाल ठाकूर देखील दिसत आहे. व्हिडीओमध्ये असंही दिसतं की, शाहिद हा विजयच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि म्हणतो, शाहिद विजयला म्हणतो, "माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप प्रेमळ भावना आहेत. जर अर्जुन रेड्डी बनला नसता, तर कबीर सिंगचा जन्म झाला नसता. थँक्यू विजय. " त्यानंतर शाहिद हा विजयच्या गालावर किस करतो.

पाहा व्हिडीओ:

'कबीर सिंग' आणि 'अर्जुन रेड्डी'ला मिळाली प्रेक्षकांची पसंती

शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' हा चित्रपट 2029 मध्ये प्रदर्शित झालेला. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अर्जुन रेड्डी या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडानं मुख्य भूमिका साकारली. तर 'कबीर सिंग' या चित्रपटात शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसले होते. 'कबीर सिंग' आणि 'अर्जुन रेड्डी' या दोन्ही मिळाली प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

शाहिद आणि विजयचे आगामी चित्रपट

शाहिद चा तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटात क्रिती सेननही मुख्य भूमिकेत होती. आता ॲमेझॉन प्राइमच्या अश्वथामा या चित्रपटातून शाहिद प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर विजय देवरकोंडा फॅमिली स्टार या चित्रपटात दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui: कार्यक्रमाला उपस्थिती, फटाके फोडताना साधला डाव, वाचा बाबा सिद्धिकींचा हत्येचा थरार!

CM on Baba Siddique: सिद्दीकी हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Who Is Baba Siddique : राष्ट्रवादीचे बाबा सिद्दीकी कोण होते? मुंबईत त्यांची गोळ्या घालून झाली हत्या

Baba Siddiqui: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या! दोन जण ताब्यात

IND vs BAN: भारतीय संघाच्या वादळात बांगलादेश नेस्तनाबूत! कसोटीपाठोपाठ T20I सिरिजमध्येही व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT