Shahid Kapoor Tweet Esakal
मनोरंजन

Shahid Kapoor: ट्वीटरवरची ब्लू टीक गेली अन् भडकला शाहिद.. कबीर सिंग अंदाजात मस्कला धमकी देत म्हणाला,'ए एलन..'

शाहिद कपूरचं ब्लू टीक संदर्भातील मजेदार ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Shahid Kapoor Tweet: अभिनेता शाहिद कपूर सोशल मीडियावर भलताच सक्रिय पहायला मिळतो. शाहिद नेहमीच चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. शाहिद देखील त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे..ज्यांची ब्लू टिक नुकतीच हटवण्यात आली आहे.

शाहिदला जेव्हापासून हे कळालं आहे की एलन मस्कनं फ्री मध्ये ब्लू टिक वापरणाऱ्यांकडून ती काढून घेतलीय तेव्हा त्यानं एक मजेदार ट्वीट शेअर केलं आहे..ते देखील कबीर सिंग स्टाईलमध्ये.

शाहिद कपूरची ब्लू टीक देखील ट्वीटरवरनं हटवण्यात आली आहे. पण याचं वाईट वाटून न घेता त्यानं सोशल मीडियावर मीम्स शेअर केलं आहे. गुरुवारी २१ एप्रिल रोजी शाहिदनं एका नेटकऱ्यानं पोस्ट केलेला मीम शेअर केलं.

आणि आपल्यातील कबीर सिंगला जागं करत त्यानं लिहिलं,''माझ्या ब्लू टिकला कोणी टच केलं..एलन..तू थांब तिथेच..मी येत आहे''.

त्यानं २०१९ साली आलेल्या आपल्या कबीर सिंग सिनेमातील डायलॉगला ट्वीट केलं आहे आणि 'हाहाहा..'असंही लिहिलं आहे.(Shahid Kapoor Raged on elon musk as kabir singh after losing twitter bluw tick shares)

शाहिदच्या या रिअॅक्शनला पाहून चाहत्यांची मात्र हसून पुरती वाट लागली आहे.एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'प्रीतीला विसरू नकोस भावा'. तर आणखी एकानं लिहिलं आहे,'हाहाहा मस्त'.

ट्वीटरवर शाहिदचं फॅनफॉलॉंइंग जबरदस्त आहे. सध्या शाहिदचे १५.४ मिलियन फॉलोअर्स ट्वीटरवर आहेत. केवळ शाहिदच नाही तर शाहरुख खान,विराट कोहली,अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा सारख्या सर्वच बड्या स्टार्सचं ट्वीटरवरील ब्लू टीक हटवण्यात आलं आहे.

ट्वीटरनं पहिल्यांदा २००९ मध्ये ब्लू चेक मार्क सिस्टिमची सुरुवात केली होती म्हणजे नेटकऱ्यांना प्रसिद्ध व्यक्ती किंवा संघटना ,कंपन्या यांच्या खऱ्या आणि योग्य अकाउंट्स अचूक ओळखता येतील.

ट्वीटरनं या व्हेरिफिकेशनसाठी सुरुवातीला कुणाकडूनही पैसे घेतले नव्हते. मस्कनं गेल्या वर्षी चेक-मार्क बॅच सोबत ट्वीटर ब्लू लॉंच केलं,ज्याच्यासाठी आता पैसे भरावे लागत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT