Shahid Kapoor,Hrithik Roshan Google
मनोरंजन

ह्रतिकच्या शर्टलेस फोटोवर शाहिद कपूर म्हणाला,''अरे हा तर...''

प्रॉडक्ट्सच्या जाहिरातीच्या निमित्तानं केलेल्या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

प्रणाली मोरे

सोशल मीडियामुळे आज आपण आपली प्रत्येक गोष्ट उत्तमरीत्या प्रमोट करून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकतो. सर्वसामान्य आपल्या फॉलोअर्ससाठी तर सेलिब्रिटी आपल्या फॅन्सची संख्या वाढवण्यासाठी नेहमीच सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आपले फोटोज आणि व्हिडीओ शेअर करीत असतात. मग ते फोटो कधी कुटुंबियांसोबतचे असतात तर कधी कामासंबंधीत प्रमोशनचे असतात. पण चर्चा तेव्हा होते जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीच्या फोटोवर,व्हिडीओवर दुसरा सेलिब्रिटी काहीतरी कमेंट करतो. आता प्रत्येकवेळेला ती कमेंट सकारात्मक असेलच असं नाही,कंगनासारख्या एखादीनं कमेंट केली तर वादाचं वादळ उठलंच म्हणायचं.

आता हे सगळं सांगायचं कारण यासाठीच की आपल्या ह्रतिक रोशननं ब-याच दिवसांनी शर्टलेस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले अनं त्याचे असंख्य चाहते एका क्षणात घायाळ झाले. त्याने हे फोटोशूट काही प्रॉडक्टसच्या प्रमोशनसाठी केले आहे. यामध्ये त्याचा बिअर्ड लूक भाव खाऊन गेलाय. तसं पहायला गेलं तर याआधी ह्रतिकचा शर्टलेस सेक्सी लूक पाहण्यात आला नाही तर तसं नाहीय मुळीच. पण वयाची पंचेचाळीशी उलटल्यानंतरही आपला चार्म तसूभरही ढळू न देण्यासाठी जी मेहनत ह्रतिकनं केलीय तिला हॅट्स ऑफ. त्याच्या या फोटोवर शाहिद कपूरनं सगळ्यात पहिली कमेंट दिली आहे. तो ह्रतिकला म्हणालाय,'हार्ड मुंडा'. तर ह्रतिकचे काही चाहते म्हणालेत,'तुमचा लूक पाहून समर सिझन सुरू झाल्यासारखा वाटतोय'. तर असंख्य चाहत्यांनी ह्रतिकच्या फोटोवर आपण घायाळ झालो आहोत अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ह्तिक तामिळ सिनेमा 'विक्रम वेधा' च्या रीमेक मध्ये काम करीत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सैफ अली खान,राधिका आपटेही दिसणार आहेत. पोलिस आणि गॅंगस्टार मधील सुपर अॅक्शन ड्रामा आपल्याला यात पाहायला मिळणार आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तर शाहिद कपूरचा 'जर्सी'ही लवकरच आपल्या भेटीस येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT