Maharashtra Shair Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाची उत्कंठा शिगेला आहे. मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत झळकत आहे.
महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर आज राज ठाकरेंच्या हस्ते लाँच झाला.
(shahir sable wife gets emotional in Maharashtra Shahir movie teaser launch programe )
शाहीर साबळे यांच्या पत्नी श्रीमती राधाबाई कृष्णराव साबळे या खास प्रसंगी उपस्थित होत्या. केदार शिंदे लाडक्या आजीला या प्रसंगी आग्रहाने घेऊन आले होते.
यावेळी बोलताना राधाबाई म्हणाल्या, "हा माझ्यासाठी एक अत्यंत हळवा प्रसंग आहे. आज मी भाऊक झाले आहे." अशा शब्दात राधाबाईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
याशिवाय टिझर लाँच प्रसंगी सिनेमाचे संगीतकार अजय - अतुल म्हणाले, " आम्ही शहीरांकडून खूप शिकलो. त्यांच्यामुळे केदार आणि आमची मैत्री झाली. या चित्रपटाचा भाग होता आले, हे आमचे भाग्य आहे. त्यासाठी आम्ही केदारचेही आभारी आहोत."
‘महाराष्ट्र शाहीर’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे!
या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. शाहिरांच्या प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ या बहुचर्चित चित्रपटाची पहिली झलक अर्थात टीझरचा प्रकाशन समारंभ शाहिरांच्या आठव्या स्मृतीदिनी सोमवारी २० मार्च २०२३ रोजी सकाळी वांद्रे येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे झाला.
'जय जय महाराष्ट्र माझा...’ या गीताला राज्य गीताचा दर्जा देवून राज्य शासनाने नुकताच हे गीत गाणाऱ्या शाहीर साबळे यांचा एकप्रकारे गौरव केला आहे.
शाहिरांच्या जन्मशताब्दी वर्षाला सप्टेंबरमध्ये सुरुवात झाल्यापासून या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.केदार शिंदे दिग्दर्शित आणि अंकुश चौधरी अभिनित ‘महाराष्ट्र शाहीर’ २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.