बॉलिवुडचा सुपस्टार शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यात काही दिवसांपुर्वी दोन अज्ञात तरुणांना पकडण्यात आले. बंगल्याची भिंत पार करून बेकायदेशररित्या खाजगी ठिकाणी घुसखोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी गुजरातमधील दोन तरुणांना ताब्यात घेतले.
त्यानंतर वांद्रे पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि 452, 34 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यावेळी दोघेही गुजरातमधील सुरतचे रहिवासी असून शाहरुख खानचे चाहते असल्याचे सांगण्यात आलं होतं मात्र आता या दोघांविरुद्ध काही गोष्टी उघड झाल्या आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दोन्ही आरोपी सुमारे 8 तास मेकअप रुममध्ये लपुन बसलेले होते. पोलिसांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 'दोन्ही आरोपी गुपचूप मन्नतमध्ये गेले आणि तिसऱ्या मजल्यावरील मेक-अप रुममध्ये जवळपास 8 तास शाहरुख खानची वाट पाहत लपुन राहिले. ते पहाटे 3 वाजता मन्नतमध्ये दाखल झाले आणि सकाळी 10.30 वाजता त्यांना पकडण्यात आले.'
मन्नतचे व्यवस्थापक कॉलीन डिसोझा यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितलं की, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांना सुरक्षा रक्षकाचा फोन आला की दोन लोक लपून बसले आहेत.
एफआयआरनुसार, दोघांनाही हाऊसकीपिंग स्टाफमधील सतीशने पाहिले होते. 'सतीशने दोघांना मेकअप रुममधुन लॉबीमध्ये आणण्याचे काम केले. तर शाहरुख खानला दोन अनोळखी लोकांना पाहून आश्चर्य वाटले. त्याचवेळी मन्नतच्या रक्षकांनी दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले.
वांद्रे पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांची चौकशी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही सांगण्यात आले. वृत्तानुसार दोघांनाही कोर्टाकडून 10,000 रुपयांचा जामीन मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.