Vijay deverakonda: विजय देवरकोंडाची स्वारी सध्या सातवें आसमान पर आहे असं दिसतंय. लाइगर सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं तो जी काही उर्मट मुक्ताफळं करत सुटलाय त्यानं तरी असंच वाटतंय. सिनेमा रिलीज झाल्यावर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बऱ्यापैकी लोक सिनेमाच्या कथेला शिव्याच घालताना दिसत आहेत. असो, तर आपण थोडं 'लाइगर' रिलीजच्या आधी एक नजर टाकूया. विजयनं आपल्या विधानांनी हिंदी प्रेक्षकांना नाराज केलंय हे तर सरळ सरळ स्पष्ट झालेलं. यादरम्यानच त्याने चक्क बॉलीवूडच्या बादशहला शाहरुखला(Shahrukh Khan) देखील आव्हान दिलं होतं. त्यानं असं काही विधान केलं की ज्यामुळे किंग खानचे चाहते त्याला सिनेमा रिलीज नंतर सुनावू लागलेयत.(Shahrukh Khan is not last superstar, i am coming,liger actor vijay deverakonda pepares to snatch shahrukh king title)
असं काय म्हणाला होता नेमका विजय?
शाहरुख खानला आता इंडस्ट्रीत जवळपास ३० वर्ष झाली आहेत. किंग खानला हिंदी सिनेमातला सेल्फ मेड सुपरस्टार म्हणून गौरविलं जातं. जे काही केलं ते स्वबळावर,कोणातही गॉडफादर नसताना,स्ट्रगल करुन सगळं मिळावलं. आता याबाबतीत तर शाहरुखला मानायलाच हवं. पण आता अशा शाहरुखला विजयनं एवढं काय आव्हान दिलं असा प्रश्न पडलाच असेल नाही का आपल्याला.
तर त्याचं झालं असं की लाइगरच्या एका प्रमोशनल कार्यक्रमात मुलाखती दरम्यान विजय देवरकोंडा म्हणाला,''मी शाहरुखची एक जुनी मुलाखत पाहिली,त्यात तो म्हणतोय की तो बॉलीवूडचा शेवटचा सुपरस्टार . तर मग असं असेल तर मी म्हणेन तो हे चुकीचं म्हणत आहे''.
विजय त्या मुलाखतीत पुढे म्हणाला,''जेव्हा मी शाहरुखची मुलाखत पाहिली,तेव्हा मला आठवतं की मला त्यावेळी म्हणायचं होतं ,शाहरुख तू हे चुकीचं बोलतोयस,तू काही शेवटचा सुपरस्टार असूच शकत नाहीस,कारण मी येतोय'', त्याच मुलाखतीत विजय म्हणाला की,''मी तुम्हाला सांगू शकत नाही की शाहरुखच्या यशानं मला खूप प्रेरित केलं आहे. त्यांनी मला ही जिद्द दिलीय की जर त्यांनी केलं,तर मी देखील करू शकेन. तुम्हाला फक्त प्रोत्साहान मिळायला हवं,आणि तुमचं टॅलेंट ओळखणारी योग्य लोकं''.
काही दिवसांपूर्वी विजय करणच्या 'कॉफी विथ करण 7' या चॅट शो मध्ये देखील हजर राहिला होता. तेव्हा तो म्हणाला होता की,''दिल्लीतून मुंबईत येऊन राज्य करणारा शाहरुख त्याचं नेहमीच प्रेरणास्थान राहिलं आहे''. विजय म्हणाला,''जेव्हा मी मोठा होत होतो,तेव्हा मी पाहिलंय,दिल्लीहून आलेल्या शाहरुखनं कसं करिअर केलं. त्यानं मला आशा दिली की हे असं घडू शकतं. मग मलाही वाटलं मी देखील याच्यासारखं करायला हवं. माझी पिढी आणि माझ्या नंतर येणारी पिढी यांना पाहून खूप काही शिकू शकते. कारण यांचे आयुष्य आम्हाला योग्य मार्ग दाखवतो''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.