sharad pawar on natya parishad election: राज्यात राजकीय वातावरण तापलं असतानाच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. येत्या १६ एप्रिल रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.
राज्यातील सध्याच्या कुरघोडीच्या राजकीय वातावरणामुळं या निवडणुकीलाही राजकीय रंग आला आहे. ही निवडणूक आता कलाकार किंवा दोन गटांमध्ये राहिलेली नाही. कारण दोन दिवसांपूर्वी एका माध्यमाने या निवडणूकीत राजयकीय हस्तक्षेप असल्याच उघड केलं आणि तेव्हापासून एकच खळबळ उडाली आहे.
(sharad pawar tweet on natya parishad election prasad kambli prashant damle)
नाट्य परिषद निवडणुकीतील दोन्ही गटांनी म्हणजे प्रशांत दामले यांच्या 'रंगकर्मी नाटक समूह' आणि प्रसाद कांबळी यांच्या 'आपलं पॅनल' ने आपापले कार्य आणि उद्दिष्टे सादर केली. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत 'आपलं पॅनल'चे प्रमुख निर्माते प्रसाद कांबळी यांनी या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असून काही अदृश्य शक्ती या निवडणुकीमागे खलबत करत असल्याचा दावा केला.
त्याला काही तास उलटले असतानाच एका माध्यमाने, या अदृश्य शक्ती कोण हे उघड केले. प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूहाला शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचा पाठिंबा असून ते या निवडणुकीसाठी रणनीती आखत असल्याचे या वृत्तात म्हंटले होते. शिवाय सामंत यांच्या शासकीय बंगल्यावर दामलेंच्या 'रंगकर्मी नाटक समूहाची' बैठक झाल्याचेही यात सांगितले गेले.
तर प्रसाद कांबळी यांच्या 'आपलं पॅनल' सोबत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त अध्यक्ष शरद पवार असल्याचीही चर्चा झाली. पण या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.
या वृत्तानंतर शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. '' अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या १६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. परिषदेचा तहहयात विश्वस्त या नात्याने निष्पक्षपाती राहून कोणत्याही पॅनेलला पाठिंबा जाहीर न करण्याची माझी भूमिका आहे. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा!'' असे ट्विट करत शरद पवार यांनी त्यांचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले.
पान दामले यांच्या गटाला खरच सामंत यांचा पाठिंबा आहे का? उदय सामंत यांच्या शासकीय बंगल्यावर 'रंगकर्मी नाटक समूह' या गटाच्या बैठका झाल्या का? याबाबत मात्र ना प्रशांत दामले यांनी उत्तर दिले ना उदय सामंत यांनी. त्यामुळे सामंत यांचा हा राजकीय हस्तक्षेप हा एक मोठा वादाचा आणि चर्चेचा विषय झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.