Sharad Ponkshe shared post on dr babasaheb ambedkar jayanti and constitution sakal
मनोरंजन

Sharad Ponkshe: राज्यघटना ही पोशाखाप्रमाणे.. शरद पोंक्षे यांची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय..

काल बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पोंक्षे यांनी केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.

नीलेश अडसूळ

Sharad Ponkshe: अभिनेते शरद पोंक्षे हे सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या कामामुळे.. कधी व्याख्याना,मुळे तर कधी सोशल मिडियावरील पोस्ट मुळे.. त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. विशेष म्हणजे ते हिंदुत्व आणि सावरकरांचे विचार यावर बरंच बोलत असतात. आता त्यांची पोस्ट ही लक्ष वेढणारी ठरली आहे.

काल 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची जयंती झाली. या निमित्ताने सर्वांनीच बाबासाहेबांना वंदन केले. मनोरंजन विश्वातूनही अनेकांनी आपले विचार व्यक्त करत बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पण यामध्ये शरद पोंक्षे यांची पोस्ट काहीशी वेगळी ठरली.

शरद पोंक्षे यांनी बाबासाहेबांचा फोटो शेयर करत बाबासाहेब आंबेडकरकर यांच्याच भाषणातील एक उतारा शेयर केला आहे. ज्यामध्ये असं लिहिलं आहे की..

"राज्यघटना ही पोशाखाप्रमाणे अंगास चांगली चपखल बसली पाहिजे. अध्यक्ष महाराज मी प्रतिज्ञा पूर्वक सांगतो की, जेव्हा जेव्हा माझे वैयक्तिक हित की सर्व देशाचे हित यात संघर्ष निर्माण झाला, तेव्हा तेव्हा मी देशाच्या हिताला प्राधान्य दिले, स्वतःच्या हिताला दुय्यम मानले ,स्वहित बुद्धीने मी आयुष्यात मार्ग चोखाळलेला नाही. जर मी आपल्या शक्तीचा आणि परिस्थितीचा स्वतःसाठी उपयोग केला असता, तर आज मी दुसऱ्याच एखाद्या स्थानी असतो.''

''देशाच्या मागण्यांचा जेव्हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा तेव्हा मी इतरांच्या पाठीमागे आहे तसुभरही नव्हतो, परंतु या देशातील जनतेच्या मनात मी नसती शंका राहू देणार नाही. मी दुसऱ्या एका अशा काही निष्ठेला बांधला गेलो आहे, की तिला मी कधीही अंतर देऊ शकणार नाही. ती निष्ठा म्हणजे माझा अस्पृश्यवर्ग .त्यांच्यात मी जन्मास आलो .त्यांचा मी आहे. जीवात जीव असेपर्यंत मी त्यांना अंतर देणार नाही .''

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

''यास्तव या विधिमंडळाला मी दृढनिष्ठेपूर्वक सांगतो की, जेव्हा अस्पृश्यांचे हित व देशाचे हित यामध्ये संघर्ष निर्माण होईल, त्यावेळी माझ्यापुरते मी सांगतो की मी अस्पृश्यांच्या हितालाच प्राधान्य देईन. देशाचे हित आधी की, माझे हित आधी असा प्रश्न उद्भवला तर मी आधी देशाचेच हित पाहीन. तसेच माझ्या समाजाचे हित आधी की देशाचे हित आधी असा जेव्हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा मी अस्पृश्य वर्गाच्या हिताच्याच बाजूने उभा राहील. - डॉ बाबासाहेब आंबेडकर.'' अशी सविस्तर पोस्ट शेयर करत ह्या महामानवास विनम्र अभिवादन, असे पोंक्षे यांनी म्हंटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT