sharad ponkshe shared post video after watching the kerala stroy film said please watch this movie sakal
मनोरंजन

Sharad Ponkshe : 'आपल्याच मुली लव्ह जिहादच्या बळी...' The Keral Stroy पाहून शरद पोंक्षे संतापले..

शरद पोंक्षे यांनी व्हिडिओ करत हिंदुस्तानातील जनतेला केलं आवाहन..

नीलेश अडसूळ

Sharad Ponkshe on The Kerala Story : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती विपुल अमृतलाल शाह यांच्या 'द केरल स्टोरी' या चित्रपटाची. लव जिहादच्या नावाखाली महिलांचे होणारे शोषण आणि सद्यस्थिती सारख्या विषयाला चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे. एका अत्यंत वेगळ्या विषयावरील मांडणी करत शाह यांनी हा चित्रपट आहे.

या चित्रपटाला बराच विरोधही झाला. एक गट या चित्रपटाच्या समर्थनार्थ ठाम उभा राहिला तर दुसरा गट या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत होता. पण अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकताच हा चित्रपट पाहिला त्यानंतर अस्वस्थ होऊ त्यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये त्यांनी समस्त हिंदूंना एक आवाहन केलं आहे.

(sharad ponkshe shared post video after watching the kerala stroy film said please watch this movie nsa95)

यामध्ये शरद पोंक्षे म्हणतात, ''नमस्कार, मी शरद पोंक्षे.. आज मी तुमच्या समोर आलोय त्याचं कारणही तसच आहे.. कारण काल रात्री मी द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहिला. आणि प्रचंड अस्वस्थ झालो.. मी रात्रभर झोपू शकलो नाही.. ''

''म्हणून मी सर्व हिंदुस्तानी बंधूना आणि भगिनींना विनंती करतो की हा चित्रपट तुम्ही चित्रपट गृहात जाऊन बघा. मी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे आभार मानतो की त्यांनी इतका महत्वा, संवेदनशील आणि धाडसी विषय हाताळले.''

''या चित्रपट पाहून मी विचार केला की हे आपल्याच बाबतीत का होतं. हिंदू मुलींना लव्ह जिहाद मध्ये कसं अडकवलं जातं आणि त्या कशा अडकतात.. तर त्याचं कारण आहे की आपल्याला आपली संस्कृती माहीत नाही, परंपरा माहीत नाही.''

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पुढे ते म्हणाले.. ''आपल्या देवांची माहिती नाही, त्याची उत्पत्ती माहीत नाही. एखाद्या देवाला हेच वाहन का हेही माहीत नसतं. कारण आपण आपल्या मुलांना सांगत नाही. आपण मॉडर्न होण्याच्या नादात आपल्या मुलांना आपलीच संस्कृती शिकवली नाही. म्हणूनच ते आपल्या हिंदू मुलींना जाळ्यात ओढतात आणि त्यांना फसवतात.''

''आणि प्रेम ही अशी गोष्ट आहे, जिथे कुणीच काही बोलू शकत नाही. हाच प्रकार करून आपल्या मुलींना फसवलं जातं. म्हणून मी आवाहन करतो, की प्रत्येक हिंदू कुटुंबाने, तरुण मुलींनी हा चित्रपट पहा. याला काही पक्ष विरोध करत आहेत, पण त्याकडे लक्ष देऊ नका.. हा चित्रपट जाऊन बघा म्हणजे कळेल किती भयानक वास्तव आहे.

''काही पक्ष हा चित्रपट खोटा आहे म्हणून ओरडतायत.. पण जो पर्यंत आपल्या घरात आग लागत नाही तोवर हे कळत नाही. जेव्हा तुमच्या मुलींना असं फसवलं जाईल तेव्हा तुमचे डोळे उघडणार आहेत का? त्यामुळे मी विनंती करतो.. या जिहाद पासून आपल्या मुलींना वाचवायचं असेल तर कृपया हा चित्रपट पहा.. कारण वेळ निघून गेली तर आपल्या हातात काहीच उरणार नाही.. त्यामुळे सावध व्हा..''अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT