Sharad Ponkshe: भारताचे राष्ट्रगीत म्हंटलं की आपल्या ओठांवर लगेच 'जन गण मन' हे तीन शब्द येतात. कारण भारत स्वातंत्र्यापासून आज 75 वर्षे झाले हे गीत आपल्या मनावर कोरले गेले आहे.
पण अचानक तुम्हाला जर. कळलं की 'जन गण मन' ऐवजी एक वेगळच गीत आपलं राष्ट्रगीत होणार होतं, तर.. अहो खरच आहे की हे, 'जन गण मन' आधी एक वेगळंच गाणं त्यावेळच्या राष्ट्रीय कॉँग्रेसने राष्ट्रगीत म्हणून निवडलं होतं..
पण अचानक काय झालं, आणि रवींद्र नाथ टागोर यांची 'जन गण मन' ही कविता राष्ट्रगीत म्हणून निवडली गेली. तोच किस्सा आज शरद पोंक्षे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे.
(Sharad ponkshe shared video and said how vande mataram was rejected and Jan gan man was selected as the national anthem )
अभिनेते शरद पोंक्षे सध्या अंदमान दौऱ्यावर गेले आहेत. सावरकरांचे विचार आणि त्यांचे राष्ट्रकार्यतील संघर्ष पोहोचवण्यासाठी शरद पोंक्षे दिवसरात्र मेहनत करत आहेत. या विषयावर ते राज्यभरात जाऊन व्याख्यान देत सावरकर विचार आणि हिंदुत्वाचा जागर करत आहे.
याच त्यांच्या विचार कार्यातील एक भाग म्हणजे अंदमान यात्रा. काही तरुणांना घेऊन पोंक्षे साध्या अंदमान येथे गेले आहेत. या ठिकाणी ते तरुणांना इतिहास उलगडून सांगत आहेत. या शिवाय सावरकरांचे कार्य, त्यांनी भोगलेल्या यातना यावर यावर पोंक्षे मुलांमध्ये जागृती करत आहेत.
याच दौऱ्यातला एक व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये ते राष्ट्रगीता मागची गोष्ट सांगत आहेत..
यामध्ये शरद पोंक्षे म्हणाले आहेत की, ''वंदे मातरम हे आपलं राष्ट्र गीत व्हायला हवं होतं.राष्ट्रीय कॉँग्रेसच्या अधिवेशनाच्या समारोपाला ही जबाबदरी रवींद्रनाथ टागोर यांच्यावर टाकली. की असं कोणतं गीत असेल जे देशाचं राष्ट्रगीत होऊ शकेल, ते तुम्ही सादर करा.''
''तेव्हा रवींद्रनाथ टागोर यांनी बनकीम चंद्रा यांचं 'वंदे मातरम' हे गाणं सादर करून दाखवलं.. पण तेव्हा रवींद्र नाथ यांनाही माहीत नव्हतं की, उद्या 'वंदे मातरम' ऐवजी आपणच कुणासाठी तरी लिहिलेली एक कविता.. राष्ट्रगीत म्हणून निवडली जाईल.' असे पोंक्षे म्हणाले आहेत.
रवींद्र नाथ टागोर यांची कविता त्यावेळी सर्वांना इतकी भावली, की 'जन गण मन' हे राष्ट्रगीत म्हणून निवड करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.