Shark Tank India 2 Scam : टीव्ही मनोरंजन विश्वात अनेक रियॅलिटी शो नं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. मात्र यासगळ्यात शार्क टँक इंडियाची गोष्टच वेगळी आहे. या मालिकेच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांना या रियॅलिटी शो नं जिंकून घेतले आहे. भारतातल्या मोठमोठ्या नवउद्योजकांना बळ आणि प्रेरणा देण्याचे काम या मालिकेनं केले आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या शो विषयी काही गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे शार्क टँक इंडिया नावाचा रियॅलिटी शो हा चर्चेत आला आहे. शार्क टँकमध्ये देशभरातून अनेक नवउद्योजक त्यांच्या बिझनेसविषयीच्या वेगवेगळ्या आयडिया घेऊन येतात. मालिकेतील जजेसला जर त्या आवडल्या तर आर्थिक स्वरुपात मोठी मदतही केली जाते.
Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा
उद्योजकांना मदतीसाठी जी आर्थिक रक्कम दिली जाते त्याचा त्यांना चेक दिला जातो. मात्र अनेकांना जो चेक देण्यात आला त्याचे पैसे त्यांना मिळाले नसल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केला आहे. त्यामुळे शार्क टँक इंडिया नावाचा शो चर्चेत आला आहे. गेले दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तिसऱ्या सीझनचे चाहत्यांना वेध लागले आहे. अशावेळी युझर्सकडून करण्यात आलेल्या आरोपांची जोरदार चर्चा होत आहे.
शार्क टँकमध्ये घोटाळा?
त्याचं झालं असं की, अनमोल शर्मा नावाच्या एका ट्विटर युझर्सनं शार्क टँक इंडिया नावाच्या शो वर असा आरोप केला आहे की, या मालिकेमध्ये डिलेड फंडिग स्कॅम सुरु आहे. अनमोल हे स्वत: उद्योजक असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी या रियॅलिटी शो मध्ये काय सुरु आहे याविषयी सविस्तपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शार्क टँक आणि चॅनेलवाले मोठ्या प्रमाणात पैसे कमावत आहे. मात्र त्या शोमध्ये जी लोकं जातात त्यांना पैसे मिळत नसल्याचे अनमोल यांचे म्हणणे आहे.
युझर्सनं केला मोठा खुलासा...
अनमोल यांनी लिहिलं आहे की, मला शार्क टँकमध्ये जे कुणी जात आहे त्यांना काही गोष्ट सविस्तरपणे सांगायच्या आहेत. या मालिकेमध्ये एका वेगळ्याच प्रकारचा घोटाळा होत असल्याचे दिसून आले आहे. ज्यांनी त्या मालिकेमध्ये सहभाग घेतला होता, त्यांना पैसे देण्याचे वचन देण्यात आले मात्र त्यांना अजून पर्यत शार्क कडून कोणत्याही प्रकारे पैसे मिळालेले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.