Shark Tank India Season 2 esakal
मनोरंजन

Shark Tank India Season 2 : वेटरचं काम केलं, रस्त्यावर विकली पुरणपोळी! आता तो...

भास्कर प्रसिद्ध अशा शार्क टँकमध्ये आला. पहिल्यांदा तो काय बोलतोय हे जजेसनं फारसं गांभीर्यानं घेतलं नाही.

सकाळ डिजिटल टीम

Shark Tank India Season 2 Bhaskar puranpoli business : भास्कर प्रसिद्ध अशा शार्क टँकमध्ये आला. पहिल्यांदा तो काय बोलतोय हे जजेसनं फारसं गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र त्या एका गोष्टीनं जजेस भारावून गेले. त्यांना भास्करची गोष्ट कमालीची प्रभावी वाटली आणि त्यांनी त्याचं तोंडभरून कौतूकही केलं.

उद्योगपती भास्करनं शार्क टँकमध्ये आपली यशोगाथा सांगितली. ती सध्या सोशल मीडियावर कमालीची लोकप्रिय झाली आहे. त्याला नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. मुळचा कर्नाटकचा असणाऱ्या भास्करनं आपल्या संघर्षमय गोष्टीनं जजेसला भारावून टाकलं. ते त्याचं ऐकतचं राहिले. ती गोष्टही तशीच होती.

Also Read - गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

Shark Tank India Season 2

कोणे एकेकाळी हॉटेलमध्ये वेटरचा काम करणारा भास्कर हा रस्त्यावर पुरणपोळी विकायचा आणि आता तो कोट्यवधीचा मालक आहे. भास्कर पुरणपोळी घर असा त्याचा ब्रँड आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्या पुरणपोळीचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शार्क टँकचा दुसरा सीझन यंदा नेटकऱ्यांना वेड लावतो आहे.

सध्याच्या सीझनमध्ये जे नवउदयोजक येत आहे त्यांचे व्हिडिओ हे तरुणांना प्रेरित करताना दिसत आहे. रस्त्यावर पुरणपोळी विकणारा भास्कर हा कोटयवधींचा मालक कसा झाला याच्या प्रमोटिव्ह व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. भास्कर हा पहिल्यांदा कर्नाटकातील एका हॉटेलमध्ये वेटरचा काम करायचा. त्यानं स्वताचा व्यवस्या सुरु करण्यापूर्वी त्यानं छोटे मोठे जॉब्सही केले होते. भास्करनं काही दिवस रस्त्यावर पुरणपोळी विकण्याचा व्यवसाय केला.

ग्राहकांना पुरणपोळीची चव आवडू लागली आणि मग मला आत्मविश्वास आला. मी स्वताचा ब्रँड तयार केला. पहिल्यांदा कर्नाटकमध्ये त्याची सुरुवात केली. भास्करनं शार्क टँकमध्ये एक टक्का इक्विटी सोबत ७५ लाख रुपयांची मागणी केली होती. शार्कला त्याची स्टोरी आवडली. मात्र त्यांनी त्याच्या व्यवसायात इन्व्हेस्ट करण्यास नकार दिला. त्यांच्या मते अगोदरच त्याच्या कंपनीनं खूप नफा कमावला आहे. आता त्याला पैशांची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT