shashank ketkar: होणार सून मी ह्या घरची', 'हे मन बावरे', 'पाहिले न मी तुला' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar)अभिनयसोबतच सामाजिक, राजकीय विषयावर देखील भाष्य करत असतो.
यावरून अनेकदा त्याला ट्रॉल देखील केले आहे. परंतु त्याने कायमच आपली भूमिका हि परखडपणे मांडली आहे. आता त्याने पुन्हा एकदा मोठ्या मुद्द्याला हात घातला आहे. तो म्हणजे मराठी भाषा.
उद्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन. सर्वत्र मराठी भाषेचा जागर करण्याचा दिवस. याच निमित्ताने भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला शशांकने एक पोस्ट शेयर करून सर्वांची शाळा घेतली आहे.
(Shashank Ketkar shared post on marathi bhasha and holi dhulivandan rangpanchami )
शशांक कायमच महत्वाच्या विषयांकडे लक्ष वेधत असतो. आपण कायमच मराठी मराठी करत असतो. मराठी भाषा, मराठी अस्मिता यांच्या आपण अनेक बाता मारत असतो. पण खरच आपण मराठीपण जपतो का? आपल्याला मराठी भाषा नेमकी माहीत आहे का? यावर विचार करायला लावणारी पोस्ट शशांकने शेयर केली आहे.
शशांकने एका दिनदर्शिकेचा फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये काही मराठी सण अधोरेखित केले आहे. लवकरच होळीचा सण येणार आहे. आपण होळीलाही होळीच म्हणतो आणि हिन्दी मुळे धूलिवंदनलाही होळीच म्हणतो. काहीजण धूलिवंदनला रंगपंचमी म्हणतात. पण मराठी भाषा आणि परंपरेनुसार हे तीनही सण वेगळे आहेत. याचे भान शशांकने करून दिले आहे.
शशांक म्हणतो, ' होळी.. धूलिवंदन.. आणि रंगपंचमी हे तीन वेगळे सण असतात !!!!! कृपा करुन रंगपंचमी ला होळी म्हणू नका.. ''आम्ही मराठी परंपरा जपतो असं म्हणणाऱ्या सर्व वाहिन्या, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार अशा सर्वांसाठी''.. आपण हिंदी च अनुकरण budget मध्ये करतो का??? नाही ना … मग चुकांमध्येतरी कशाला..''
त्यामुळे हे तीन सण वेगळे आहेत हे इथून पुढे सगळ्यांच्या लक्षात राहील अशी ही शशांकची पोस्ट आहे. त्यामुळे भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.