Shyamchi Aai Movie: साने गुरुजी (Sane Guruji) या नावाने सर्वांच्या परिचयाचे असणाऱ्या पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या कादंबरीवर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं नाव 'श्यामची आई' असं आहे.
'श्यामची आई' चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. साने गुरुजींच्या भूमिकेत ओम भूतकर, तर श्यामच्या आईच्या भूमिकेत गौरी देशपांडे दिसणार आहे.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जिथे कृष्णधवल चित्रपटांना रंगीन बनवण्याची अद्भूत किमया केली जाते, तिथे 'श्यामची आई' हा चित्रपट कृष्णधवल रूपात पहायला मिळणार आहे. साने गुरुजींच्या अंर्तमनातून आलेली आईच्या आकृतीचे प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर सादर करण्याचं शिवधनुष्य 'श्यामची आई' या चित्रपटाच्या माध्यमातून उचलण्यात आलं आहे. या चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या सिनेमाविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. 'शाळा','फुंतरु','आजोबा','केसरी' सारखे सिनेमे बनवणाऱ्या सुजय डहाकेच्या सिनेमांनी नेहमीच प्रेक्षकांनाउत्कृष्ट कलाकृती पाहायला दिल्या आहेत. यामुळे सुजयच्या आगामी श्यामची आई सिनेमाविषयी सर्वांना उत्सुकता आहे. श्यामची आई सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज आहे. सारंग साठे, संदीप पाठक, ज्योती चांदेकर असे अनेक प्रसिद्ध कलाकार या सिनेमात आहेत.
'श्यामची आई' या सिनेमाची निर्मिती अमृता फिल्म्स बॅनरअंतर्गत अमृता अरुण राव यांनी केली आहे. अमृता राव यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक विषयांवरील चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सुजय सारखा उत्कृष्ट दिग्दर्शक नेहमीच दर्जेदार साहित्याची अचूक निवड करत त्याला दृकश्राव्य माध्यमातून लोकांच्या भेटीस आणत गेला आहे.
याआधी सुद्धा सुजयने शाळा कादंबरीचा उत्कृष्ट सिनेमा बनवला. आता 'श्यामची आई' च्या माध्यमातून सुजय काय कमाल करतो हे कळेलच. सिनेमाची रिलीज डेट समोर आली नसली तरीही याच वर्षी २०२३ ला सिनेमा रिलीज होतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.