sheetal-thakkar 
मनोरंजन

शीतल साकारणार उद्योजिका 

- अरूण सुर्वे

"साराभाई व्हर्सेस साराभाई', "करिना-करीना' तसेच टीव्हीवरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या शीतल ठक्कर या अभिनेत्रीने "बाझीगर' आणि "सतरंगी ससुराल' या मालिकांमध्येही भूमिका रंगविल्या होत्या. आता ती "जीजी मॉं' या मालिकेतही प्रवेश करणार आहे. यात ती उत्तरादेवी यांची प्रतिस्पर्धी मैथिली सेनगुप्ता या महिला उद्योजिकेची भूमिका साकारणार आहे. 

उत्तरादेवी ही हुकुमशाही प्रवृत्तीची असते, तर मैथिली ही लोकशाही मानणारी असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ती सर्व कर्मचाऱ्यांचे मत काय आहे, ते जाणून घेते. तिच्या या स्वभावामुळे सर्व कर्मचारी तिच्यावर खुश असतात. मैथिली ही एका सहृदय बॉसची भूमिका साकारणार आहे. आपला बॉस असा असावा, असे प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटत असते. अलीकडेच मुलाला जन्म दिल्यामुळे शीतलने अभिनयापासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता ती छोट्या पडद्यावर परतली असून तिने आपला लूक बदलून टाकला आहे. 

शीतल म्हणाली, ""मला मैथिलीची भूमिका ही टीव्हीवरील अन्य दैनंदिन मालिकांतील भूमिकांपेक्षा वेगळी असल्याचं जाणवलं. ती एक यशस्वी उद्योजिका असली, तरी हुकुमशाही वृत्तीची नसते. ती सर्वांना बरोबर घेऊन जाणारी, मनमिळाऊ स्वभावाची असते आणि हा स्वभाव उत्तरादेवीच्या अगदीच विरोधी आहे. आम्ही यात माझं रूप कसं असेल, त्यावर बराच विचार केला आणि विविध रूपं तयार करून पाहिली. असं सहसा घडत नाही.'' 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Murder Case: 'विकिपीडिया'ला सुप्रीम कोर्टाचे आदेश! कोलकाता घटनेतील पीडितेचे नाव अन् फोटो केला प्रसिद्ध

Rohit Sharma चा बांगलादेशविरुद्ध जर दिसला हिटमॅन अवतार, तर रचणार तीन मोठे रेकॉर्ड

Ganesh Visarjan 2024 LIVE : मुख्यमंत्री शिंदे,फडणवीस गिरगाव चौपाटीवर

Jio Network Outage Causes : अंबानी बाप बेट्याचं भांडण की डेटा सेंटरला आग? जिओ डाऊन होण्यामागचं कारण काय? अफवांना उधाण

Ganesh Visarjan Pune: पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मूर्तीच्या डेकोरेशनला आग; स्वयंसेवकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT