sheezan khan, sheezan khan news, tunisha sharma, tunisha sharma news, tunisha sharma end her life Esakal
मनोरंजन

Khatron Ke Khiladi 13: तुनिषाची आई काही गप्प बसेना! शिजानच्या अडचणी पुन्हा वाढवल्या..थेट चॅनललाच पाठवली नोटीस

Vaishali Patil

sheezan khan: टिव्हि विश्वातील लोकप्रिय अभिनेता शिजान खान हा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आला आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शिजानवर गंभीर आरोप केले होते. त्यानेच तुनिशाला आमहत्या करण्यासाठी प्रवृत्त केले असं आरोप करत त्यांनी शिजान विरोध तक्रारही दाखल केली होती.

आता शीझान पुन्हा त्याच्या कामावर परतला आहे. नुकत्याच बातमीनुसार शिजान आता खतरो के खिलाडीच्या 13व्या सिझनमध्ये दिसणार आहे.

यासाठी त्याने कोर्टात अर्जही दाखल केला होता कारण कोर्टाने त्याचे पासपोर्ट जप्त केले होते. त्याला परदेशात जाण्याची परवानगी नाकरण्यात आली होती. मात्र आता त्याला दिलासा देत शीझानचा हा अर्ज मुंबईच्या वसई न्यायालयाने मंजूर केला आहे.

शीझानला परदेशात जाण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्याचवेळी न्यायालयाने प्राधिकरणाला त्यांचे पासपोर्ट परत करण्यास सांगितले आहे.

 खतरों के खिलाडी 13 सुरू होण्याआधीच त्याच्या स्पर्धकांची नावे चर्चेत आहेत. या शोमध्ये शीजान खानच्या एन्ट्रीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खतरों के खिलाडी 13 चे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होणार आहे.

एकीकडे शीजीनचा परिवार खुश असतांना आता दुसरीकडे तुनिषाची आई वनिता यांनी शीजनला या शो घेतल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

तुनिषा शर्माच्या आईने एका निवेदनात म्हटले आहे की चॅनल ही अतिशय चुकीची गोष्टी करत आहे. शीजान खानवर आयपीसीच्या कलम 306 अंतर्गत आरोप करण्यात आले असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 524 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

खतरों के खिलाडी 13 सारखे मोठे व्यासपीठ त्यांच्यासारख्या व्यक्तीला देणं चुकीचा संदेश पसरवेल असंही त्या म्हणाल्या. लोक टीव्ही स्टार्स आणि सेलिब्रिटींना आपला आदर्श मानतात आणि तुम्ही त्यांला शोमध्ये घेवू शकत नाही.

तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात शीजनचे नाव समोर आल्यानंतर त्याला 70 दिवस तुरुंगात काढावे लागले. मात्र, नंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. आता कुठे तो पुन्हा त्याच्या कामावर परतला होता. त्याचे नाव खतरों के खिलाडी 13 च्या संघात सामील झालं आहे अशी चर्चा सुरु असतांनाच आता तो पुन्हा अडचणीत सापडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT